शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

मोरगावच्या पुलाला अपघाताची प्रतीक्षा

By admin | Updated: November 26, 2014 23:00 IST

पश्चिमेस असणाऱ्या पंचवीस गावाची रहदारी सोसणारा मोरगाव-महालगाव मधात असणाऱ्या नरीवरच्या पूलाला भगदाड तसेच तो पूल पूर्णत: उखडला असताना जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या

राजू बांते - मोहाडीपश्चिमेस असणाऱ्या पंचवीस गावाची रहदारी सोसणारा मोरगाव-महालगाव मधात असणाऱ्या नरीवरच्या पूलाला भगदाड तसेच तो पूल पूर्णत: उखडला असताना जिल्हा परिषदेचा सार्वजनिक बांधकाम विभाग मोठ्या अपघाताची प्रतिक्षा करीत आहेत.मोरगाव-महालगाव या गावच्या मधात गायमुख नदी आहे. तीन दशकापूर्वी या नदीवर पूलाचा निर्माण करण्यात आला. हा पूल पायल्यांवर उभा केला गेला आहे. या पूलासाठी कान्हळगावच्या स्थानिक नेत्यांनी संघर्ष केला होता. मोहाडीला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. या पुलावरील २५ गावाचे लोक, विद्यार्थी मोहाडीला आवागमन करतात. पुलाच्या निर्माण झाल्यापासून आजवर कोट्यवधी रूपयाच्या घरात या पुलावर रूपये खर्च करण्यात आले. ज्यांना या पुलाचा काम करण्याची दरवर्षी संधी मिळाली त्या अधिकारी व कंत्राटदारांनी चांगली कमाई केली.मोरगावच्या पुलाला आजघडीला ३० वर्षापेक्षा अधिक वर्ष झाली तरी प्रत्येक वर्षीच्या पावसाच्या प्रवाहात या पुलाची दैनावस्था होत असते. यावर्षीच्या पावसाच्या प्रवाहाने पुलाचा वरचा भाग पूर्णत: उखडला आहे. जागोजागी पॅचेस पडले आहेत. पुलावरच्या एका भागास पुलाच्या आरपार मोठा खड्डा पडलेला आहे. या पुलावरून वाहने चालविणे अतिशय धोकादायक झाले आहे. या पुलावरून रात्री येताना येणाऱ्यांना अनेकदा विचार करावा लागतो. या पुलावरुन कित्येकजण खाली पडले आहेत. मोरगावचा पूल अपघातप्रवणस्थळ बनलेला आहे. या पुलावरून लोकप्रतिनिधीही ये-जा करतात. मात्र जनतेसाठी तयार करण्यात आलेल्या पुलाची दुरूस्ती करण्यासाठी पुढाकार घेण्यासाठी कोणताही लोकप्रतिनिधी समोर येत नाही. जिल्हा परिषदेचा तुमसर सार्वजनिक बांधकाम उपविभाग अजूनही निद्रीस्त आहे.पुलाची उंची वाढवामोरगावचा पूल कंत्राटदारांसाठी कमाईचे साधन ठरले आहे. या पुलावरून येणारे विद्यार्थी, रहदारी करणारी जनता पडो किंवा मरो याचे घेणदेण नसलेला बांधकाम विभाग दुरून जनतेच्या सहनशिलतेची परीक्षा घेत आहे. दरवर्षी लाखो रूपये पाण्यात जाण्यापेक्षा मोरगावच्या पुलाची उंची वाढविली पाहिजे, अशी जनतेची मागणी आहे.