शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी तालुक्यात १,९२९ घरकुलांची प्रतीक्षा

By admin | Updated: February 6, 2016 00:36 IST

मोहाडी तालुक्यात ओबीसींना घरकुलांची प्रतीक्षा आहे. सुमारे २४ गावातील १९२९ लाभार्थ्यांचे मास्टर यादीमध्ये नाव असुनही गावाला निधी मिळत नसल्याने ...

१० वर्षांपासून संपता संपेना याद्या : स्वतंत्र योजना राबविण्याची मागणी, व्यथा इतर मागासवर्गीयांचीयुवराज गोमासे करडी/पालोरामोहाडी तालुक्यात ओबीसींना घरकुलांची प्रतीक्षा आहे. सुमारे २४ गावातील १९२९ लाभार्थ्यांचे मास्टर यादीमध्ये नाव असुनही गावाला निधी मिळत नसल्याने त्यांचे घरकुाचे स्वप्न स्वप्नच ठरु पाहत आहेत. अन्य समाजातील बांधवांसाठी शासन योजनांवर योजना राबवित असून लाभार्थी सापडणे मुश्किल झाले असतांना ओबीसीमध्ये गरजू व गरीब नाहीत काय, असा प्रश्न विचारला जात आहे.मोहाडी तालुक्यात मागील दहा वर्षांपासून ओबीसींच्या घरकुलांचा प्रश्न सुटलेला नाही.माहाडी तालुक्यात एकुण ७८ ग्रामपंचायती असून २४ गावातील १९२९ लाभार्थी प्रतिक्षेत आहेत. सन २०१५ मध्ये तालुक्याला ७२ घरकुलांचा कोटा मिळाला. त्यामुळे २४ गावांना प्रत्येकी ३ घरकुलाचा टारगेट देण्यात आला. ओबीसी समाजातील गरिबांना घर बांधणे दिवास्वप्न ठरल्यासारखी अवस्था आहे. अनेक वर्षापासून गावातील प्रतिक्षा याद्या संपलेल्या नाहीत. गावात विस्तार व लोकसंख्या वाढली, पंरतु तालुक्यातील सुमारे २४ गावातील जुन्या प्रतीक्षा याद्या संपलेल्या नाहीत सन २०१४ मध्ये तयार करण्यात आलेल्या नविन प्रतीक्षा याद्यांची त्यात पुन्हा नव्याने भर पडली आहे. शासन अनेक योजना राबवित आहे. त्यामुळे अन्य समाजाला मोठा आधार लाभला. अनेक कुटूंबाचे घरकुल त्या पैश्यातून बांधले गेले. अनेकांनी तर घरकुलाच्या निधीत घरचे पैसे ओतून घरे बांधलीत. कुणाचा विरोध करण्याचा या मागचा हेतू नाही. पंरतू ओबीसी समाज मोठा असतांना, त्यांच्यातही गरिबांची संख्या अधिक असतांना शासन-प्रशासनाकडून या दुर्लक्षित घटकांचा विचार होताना दिसत नाही. ओबीसी समाजात गरीब नाहीत, असाच गैरसमज शासनाचा झाल्याचे दिसून येत आहे. ओबीसींचे लाभार्थी घरकुलाचे प्रतीक्षेत असतांना त्यांना लाभ मिळत नाही.घरकुले मंजूर होणार असल्याचे सांगितले गेल्याने तालुक्यातील काही गावातील नागरिकांनी आपले झोपडे दोन वर्षांअगोदर पाडले. मात्र अजुनही त्यांना घरकुल मिळाले नाही. ओबीसींचे अनेक पुढारी शासनात व विरोधात असतांना त्यांनाही आपल्याच समाजातील नागरिकांच्या समस्या दिसू नयेत याचेच खरे तर आश्चर्य व्यक्त होण्यासारखी अवस्था आहे.