शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सुखद! चिंचोलीत बछड्यासह वाघिणीचे दर्शन; वनविभागाच्या अधिकाऱ्यासह वन्यप्रेमी सुखावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2021 11:20 IST

नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांचे गस्ती पथक तयार करण्यात आले आहेत. पथक रात्रंदिवस गस्त घालीत असून वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.

ठळक मुद्देनाकाडाेंगरी वनपरिक्षेत्र : भंडारा वनविभागातील वन्यप्रेमी सुखावले

भंडारा : निसर्गाची मुक्त उधळण व सातपुडा पर्वत रांगातील घनदाट जंगलातील नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या चिंचाेली परिसरात बछड्यासह वाघिणीचे दर्शन झाले. यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यासह वन्यप्रेमी सुखावले आहेत. वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघिणीचे दर्शन झाले. तुमसर ताुलुक्यातील नाकाडाेंगरी परिसरात घनदाट जंगल आहे. या जंगलात वन्यप्राण्यांसाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. त्यात एक वाघिणी बछड्यासह ट्रॅप झाली. ही माहिती उपवनसंरक्षक एस. बी. भलावी यांना देण्यात आली. त्यांच्या सूचनेवरून परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. 

नाकाडाेंगरी वनपरिक्षेत्रातील वनरक्षकांचे गस्ती पथक तयार करण्यात आले आहेत. पथक रात्रंदिवस गस्त घालीत असून वाघिणीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. त्याचप्रमाणे वनविभागातील क्षेत्रीय कर्मचारी शेजारील गावामध्ये जाऊन जनजागृती अभियान राबवित आहे. परिसरातील विहिरींना जाळी लावून बंद करण्यात आले. लाेकप्रतिनिधींनासुध्दा सूचना देण्यात आली आहे. या वाघिणीवर सनियंत्रण उपवनसंरक्षक एस.बी. भलावी यांच्या मार्गदर्शनात प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी साकेत शेंडे, वनपरिक्षक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय, वनपाल सुनील दिघाेरे, वनरक्षक लक्ष्मीकांत बाेरकर, तसेच इतर क्षेत्रीय कर्मचारी, हिरापूर संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि चिखलीच्या सरपंचांचे वनप्राणी व्यवस्थापनेत याेगदान आहे.

जंगलात एकटे जाण्यास मनाईनाकाडाेंगरी वनपरिक्षेत्रात बछड्यासह वाघिणीचे दर्शन झाल्याने सायंकाळनंतर जंगलाच्या दिशेने एकटे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पाळीव प्राण्यांना जंगलात मुक्त चराईसाठी मनाई करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गुराख्यानासुध्दा या परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. गावागावात वाघाबद्दल जनजागृतीही करण्यात येत आहे.

निसर्ग संपन्न भंडारा जिल्ह्यात वन्य जीवांचा मुक्त संचार सुरु आहे. चिंचाेली जंगलात पहिल्यांदाच वाघीण आणि बछड्यांचे दर्शन झाले. सुरक्षेसाठी विविध उपाय याेजन्यात आले असून परिसरातील विहिरींना जाळी लावण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. - एस. बी. भलावी, उपवनसंरक्षक, भंडारा

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग