शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नपूर्तीसाठी शेतीशी एकनिष्ठ विष्णू आथिलकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

अशा या शेतकऱ्याच्या स्वप्नपूर्तीला महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने आणखी बळ दिले आहे. पुरस्कार घोषित झाल्यापासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. ...

अशा या शेतकऱ्याच्या स्वप्नपूर्तीला महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने आणखी बळ दिले आहे. पुरस्कार घोषित झाल्यापासून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. आमदार राजू कारेमोरे, गटविकास अधिकारी रवींद्र वंजारी, कृषी विस्तार अधिकारी भाग्यवान भोयर, कृषी पर्यवेक्षक भारत समरीत, तालुका कृषी अधिकारी शिवाजी मिरासे, सुरगंगा कंपनीचे संचालक अभिजित गजभिये यांनी त्यांचे कौतुक केले. लवकरच शासनस्तरावर पुरस्कार दिला जाणार आहे.

बॉक्स

दुधाची उच्च दरात विक्री

विष्णू आथिलकर यांच्याकडे निर्माण होणाऱ्या दुधाला मोठी मागणी असते. बाजारभावापेक्षा अधिक किंमत देऊन त्यांच्याकडील दूध ग्राहक खरेदी करतात. भंडारा शहरात आथिलकर यांच्या दुधाला मोठी मागणी असते. अनेक ग्राहक तर शेतात येऊनच दूध घेऊन जातात. गुणवत्तापूर्ण शेतीमाल तयार केला की, त्याला ग्राहक मिळतातच, असा त्यांचा विश्वास आहे. बाजारात जाऊन शेतमाल कुणीही विकताे. मात्र, विष्णू आथिलकर यांच्या विश्वासार्हतेने ग्राहक शेतात येऊन खरेदी करतात.

बॉक्स

उद्‌ध्वस्त व्यवसायाला बळ देणारा शेतकरी

सन २००२ मध्ये पिंपळगाव परिसरात मोठे वादळ आले होते. या वादळात आथिलकर यांची संपूर्ण फळबाग उद्ध्वस्त झाली होती. पाच एकरांत पिकाचा सडा पडला होता. मोठे नुकसान झाले होते. अशा परिस्थितीतही आथिलकर यांनी धीर सोडला नाही. सातत्याने संकटावर मात करीत स्वप्नपूर्तीसाठी ते एकनिष्ठ राहिले आणि प्रगतीचे यशस्वीकरण गाठले.

बॉक्स

शेती व्यवसाय करताना सामाजिक भानही आथिलकर जोपासत आहेत. लगतच्या नेरी येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होते. गतवर्षी आथिलकर यांनी पिकाला पाण्याची पर्वा न करता स्वत:च्या शेतातील बोअरवेलचे पाणी नागरिकांना दिले. जवळपास चार महिने त्यांचा हा उपक्रम नि:शुल्क सुरू होता. उलट पिकातून पाण्याचे टँकर जात असल्याने त्यांना नुकसान सहन करावा लागले.