शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

भारनियमनाविरूद्ध शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2016 00:19 IST

तालुक्यातील १६ तासाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी तालुक्यातील शेतकरी विविध प्रकारे मागणी करीत आहे.

कृषी उत्पादनावर परिणाम! : ऊर्जामंत्र्यांशी करणार चर्चासाकोली : तालुक्यातील १६ तासाचे भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी तालुक्यातील शेतकरी विविध प्रकारे मागणी करीत आहे. मात्र या क्रुर शासनाला काही शेतकऱ्यांची दया येत नाही. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून शेतकरी येत्या १४ तारखेला उर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेदरम्यान भारनियमन बंद न झालस दि. १६ पासून जुनी पंचायत समिती कार्यालयासमोर शेतकरी आमरण उपोषणाला बसणार आहेत. अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य अशोक कापगते यांनी दिली आहे.साकोली तालुक्यात महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीद्वारे शेतीसाठी कृषी फीडर वेगळे करण्यात आले. सुरवातीला कृषी फिडर वेगळे केल्यानंतर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. भारनियमन होणार नाही असे सांगण्यात आले. मात्र माच्र महिन्यापासून शेतीच्या कृषीपंपाना फक्त आठ तास विजपुरवठा देण्यात येईल असा आदेश काढण्यात आला. शेतकऱ्यांनी जि.प. सदस्य अशोक कापगते, अविनाश ब्राम्हणकर यांच्या नेतृत्वात विजवितरण कंपनी समोर धरणे आंदोलन घेण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता यांनी भारनियमन विरोधात शेतकऱ्यांच्या समस्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगु व त्यावर तोडगा काढू असे आश्वासन दिले. हे आश्वासनही फोल ठरले. त्यामुळे शेतकऱ्यांनी ७ ला आमदार बाळा काशीवार यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली व भारनियमनाची समस्या सांगितली. मात्र यातुनही तोडगा निघाला नाही. त्यामुळे १४ ला उर्जामंत्री बावनकुळे यांच्या दालनात कैफीयत मांडणार आहेत. जोपर्यंत भारनियमन बंद होणार नाही तोपर्यंत बेमुदत आंदोलन करणार आहेत. याबाबत माहिती अशोक कापगते, अविनाश ब्राम्हणकर, नंदकिशोर समरीत, नरेश नगरीकर, अशोक बोरकर, सतीश कापगते, सुधीर गोबाडे यांनी दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)