शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

पाऊणगावात वाघीणीचे दर्शन

By admin | Updated: November 9, 2014 22:27 IST

उमरेड कऱ्हांडला अभयारण्याअंतर्गत येणाऱ्या पवनी वनक्षेत्रात पाऊणगाव रोडवर टी - ५ या वाघीणीचे पर्यटकांना दर्शन झाले.

नागरिकांमध्ये भीती : पर्यटकांच्या संख्येत वाढ पवनी : उमरेड कऱ्हांडला अभयारण्याअंतर्गत येणाऱ्या पवनी वनक्षेत्रात पाऊणगाव रोडवर टी - ५ या वाघीणीचे पर्यटकांना दर्शन झाले.वनक्षेत्राधिकारी गायकवाड, भागवत आकरे तसेच वनरक्षक कोहाट यांनी पवनी अभयारण्याला भेट दिली असता, पाऊणगावच्या समोर १ कि.मी. अंतरावर रस्त्याच्या कडेला मचाणजवळ टी - ५ ही वाघीण सकाळी ९.३० च्या सुमारास दिसली. जवळजवळ ५ ते ६ मिनिटापर्यंत ती त्याच ठिकाणी थांबून होती. पवनीतील रहिवासी बंडू तटवार हे आपल्या मित्रपरिवारासह या व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली असता त्यांना देखील हीच टी - ५ वाघीण आढळली.या अभयारण्यात जय हा वाघ असून टी - ५ ही वाघीण २५ कि.मी. च्या परिसरात भ्रमण करीत असल्याचे वनक्षेत्राधिकारी गायकवाड यांनी लोकमतशी बोतलाना सांगितले. उमरेड कऱ्हांडला हा १८९ कि.मी. चा परिसर असून या परिसरामध्ये जय हा फिरत असल्याचे वनक्षेत्राधिकारी गायकवाड यांनी सांगितले. या जंगलामध्ये रानगव्यांचे कळप असून बिबट्या, हरिण, सांभार, रानगाई, अस्वल, मोर, ससे आदी वन्यप्राणी भरपूर प्रमाणात असून पर्यटकांना पाहण्याच्या दृष्टीकोण योग्य असे हे अभयारण्य आहे. भंडारा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्याच्या अगदी जवळ असणारे हे अभयारण्य पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय कमी खर्चाचे अभयारण्य आहे. या ठिकाणी पर्यटकांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक देखील आहेत.याच अभयारण्यामध्ये असणारे कोरंभी महादेवाचे मंदिर असून गिरजेच्या माहेर असलेले दोन मोठ्या कप्प्या आहेत. (पोकळी असलेली दरी) जंगलातून भ्रमण करताना पक्षाचे मधूर आवाज कानी पडत असतात. काही ठिकाणी वाघाच्या पाऊलाचे ठसे देखील पहावयास मिळतात. वाघ किंवा वाघीण कोणत्या दिशेनी गेली आहे हे यावरून आपल्याला कळून येते व त्यावरून आपणाला वाघ कुठे असेल असा अंदाज बांधता येतो. पर्यटकांना वन्यप्राणी पाहण्याच्या दृष्टीकोणातून मचाणाची व्यवस्था देखील या अभयारण्यात करण्यात आली आहे. या अभयारण्याला दररोज पर्यटक भेट देत असतात. दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत असून बाहेर गावावरून येणाऱ्या पर्यटकांना यासोबत गोसे धरण, बौद्ध स्तूप व पवनीतील प्रसिद्ध मंदिरे पाहण्याचा योग साधता येतो. (तालुका प्रतिनिधी)