शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
3
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
4
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
5
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
6
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
7
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
8
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
9
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
10
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
11
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
12
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
13
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
14
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
15
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
16
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
17
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
18
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
19
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
20
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव

नात्याला काळिमा! चॉकलेटचे आमिष देत चुलत काकाचा सहा वर्षीय पुतणीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 14:14 IST

लाखनी तालुक्यातील घटना

लाखनी (भंडारा) : चॉकलेटचे आमिष देत पहिल्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षीय पुतणीवर चुलत काकाने लैंगिक अत्याचार करण्याची घटना लाखनी तालुक्यातील एका गावात मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. उपचारासाठी बालिकेला भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मंगळवारी बालिका आपल्या घरी होती. वडील आणि आई कामावर गेली होती. वडील कामावर असताना घरून फोन आला, मुलगी खुर्चीवरून पडली असून तिला रक्तस्त्राव होत आहे. वडिलांनी घरी धाव घेऊन लाखनीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी मुलगी खुर्चीवरून पडली नसून तिच्यावर कोणीतरी लैंगिक आत्याचा केल्याचे सांगितले. त्यांनंतर मुलीला विचारले असता शेजारी राहणाऱ्या चुलत काकाने अत्याचार केल्याचे सांगितले.

दुपारच्या वेळी १६ वर्षीय चुलत काकाने चॉकलेटचे आमिष दाखवून घरी बोलावले आणि लैंगिक अत्याचार केले. घरी खुर्चीवरून पडल्याचे सांगण्यास चुलत काकानेच सांगितल्याचे बालिकेने यावेळी सांगितले.  बालिकेची प्रकृती गंभीर असल्याने तिला डॉक्टरांनी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. या प्रकरणी भादंवि ३७६ (१), ३७६ (ए,बी) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम कलम ४, ६ अन्वये लाखनी ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक मिलिंद तायडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणMolestationविनयभंगbhandara-acभंडारा