शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

तंमुस अध्यक्ष पदाकरिता निवडणूक

By admin | Updated: September 9, 2016 01:33 IST

तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाकरीता आज दुपारपासून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. गावातील दोन हजार युवक-युवतीनी

२००० मतदारांचा सहभाग : पोलीस बंदोबस्तात झाले मतदानवरठी : तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाकरीता आज दुपारपासून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. गावातील दोन हजार युवक-युवतीनी महिला-पुरूषानी यात उत्स्फुर्त सहभाग घेतल्यामुळे या निवडणुकीला असाधारण महत्व प्राप्त झाले. रिंगणात ९ उमेदवार असून रात्री उशिरापर्यंत मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया सुरू राहील, असे चित्र पहावयास मिळाले. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि पदाधिकाऱ्याची धावपळ अशा तणावपुर्ण वातावरणात निवडणूक प्रक्रिया सुरू होती.ग्रामपंचायत वरठी येथे आज ८ सप्टेंबरला विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच संजय मिरासे यांच्या अध्यक्षतेत ग्रामसभा सुरू झाली. तंटामुक्त समिती निवड विषय येताच हुल्लडबाजी सुरू झाली. इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या घोषणाबाजीमुळे निवड प्रक्रिया मतदान स्वरूपात घेण्याचे ठरविण्यात आले. अध्यक्ष पदाकरिता ९ उमेदवारानी अर्ज दाखल केले. यात विद्यमान अध्यक्ष अश्विन मेश्राम, माजी अध्यक्ष सुरजभान चव्हाण, मनिष मेश्राम, सावन दमाहे, प्रविण सुखदेवे, अनिल पांडे, मुकेश कोहपरकर, मिलिंद धारगावे व राजन बागडे यांचा समावेश होता. रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरूच होती. (वार्ताहर)निवडणुकीला सार्वजनिक स्वरूपप्रथमच वरठी येथे तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग हा सार्वत्रिक निवडणूक प्रमाणे होता. घराघरातून मतदानाला आणण्यासाठी चार चाकी वाहने कामाला लागली होती. प्रत्येक उमेदवार ताकदीने कामाला लागला होता. त्याचे कुटूंबिय नमस्कार चमत्कार आणि आवभगत करण्याबरोबर भेटी गाठी करण्यात व्यस्त दिसत होते.ग्रामपंचायतने केली होती जय्यत तयारीतंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदाची निवडणूक होणार होती. कोरमअभावी तहकुब होणाऱ्या सभेत लोकांची गर्दी होणार यासाठी ग्रामपंचायतच्यावतीने शामियाना आणि ध्वनीक्षेपक यंत्रांसह मतदानाची जय्यत तयारी केली होती.पोलिसांचा चोख बंदोबस्तवरठी हे गाव संवेदनशिल असल्यामुळे उपनिरीक्षक गणेश खंडाते, उपनिरीक्षक करांडे यांच्यासह १५ पोलीस कर्मचारी तैनात होते. बंदोबस्ताकरीता भंडारा येथून कर्मचारी तैनात होते. बंदोबस्तामुळे मतदान शांततेत सुरू होते.