शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
3
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
4
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
5
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मधूनही दीपिका पादुकोण बाहेर? मेकर्सने केलं स्पष्ट
6
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
7
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
8
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
9
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
10
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
11
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
12
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
13
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
14
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
15
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
16
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
17
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
18
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
19
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
20
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर पालिकेचे कार्य प्रशंसनीय

By admin | Updated: September 22, 2016 00:37 IST

हागणदारीमुक्त अभियानाची राज्यस्तरीय पथकाकडून पाहणी दरम्यान शहरातील १० मुख्य ठिकाणाची तपासणी करण्यात आली.

सुधीर शंभरकर यांची माहिती : राज्यस्तरीय हागणदारीमुक्त पथकाची पाहणी तुमसर : हागणदारीमुक्त अभियानाची राज्यस्तरीय पथकाकडून पाहणी दरम्यान शहरातील १० मुख्य ठिकाणाची तपासणी करण्यात आली. सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता, परिसरातील स्वच्छता व शहराचे सौंदर्यीकरण भुरळ पाडणारे आहे. विशेष म्हणजे प्रात:वेळी एकही इसम उघड्यावर शौच करताना आढळले नाही. एकंदरीत नगर पालिकेचे कार्य पथकाला प्रशंसनिय वाटले असून केंद्रीय समितीकडे शिफारस करण्यात येत आहे, अशी माहिती सुधीर शंभरकर उपसंचालक नगरप्रशासन नागपूर विभाग यांनी लोकमतला दिली. यावेळी राज्यस्तरीय पथकातील नागपूर महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त रिजवान सिद्धीकी, शोभा राऊत, समाज सेविका दुर्गा भरळे उपस्थित होते.सुधीर शंभरकर म्हणाले, यापुर्वी सन १९९३ मध्ये अशीच पाहणी करण्याकरिता तुमसर नगरपरिषदेमध्ये आले असताना त्यावेळी नाराज होऊन परतलो होतो. तुमसर माझ्याकरिता नवीन नव्हता. कुठे कुठे उघड्यावर शौच केल्या जाते हे माझ्या लक्षात होते. त्यामुळे आमच्या पथकाने आज २१ सप्टेंबरला पहाटे ५.१५ ला तुमसर गाठून शहराबाहेरील त्या रस्त्यावर आमचे पथक तैनात झाले होते. मात्र एकही इसम उघड्यावर शौच करताना दिसला नाही. त्यासाठी नगर परिषद कर्मचाऱ्यांचेही कौतूक करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर तुमसरचे नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे हे कर्तृत्ववान, क्रियाशिल नगराध्यक्ष असून त्यांना मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने हे समविचारी मिळाल्याने झपाट्याने शहराचा विकास करून सौंदर्यीकरण शक्य झाले, असे कोणत्याही नगर परिषदमध्ये पाहायला मिळत नाही. दोन वर्षापुर्वीचा तुमसर व आताच्या तुमसरात बराच फरक पाहायला मिळाल्याने पथकाने त्यांच्या कार्याची स्तुती केली.हागणदारी मुक्त अभियानअंतर्गत तुमसर नगर परिषदची निवड करून केंद्रीय समितीकडे नगर परिषदची शिफारसही करण्यात आली आहे. राज्यस्तरावर तुमसरचे नाव तर चकाकलेच आहे. ते आता केंद्रापर्यंत पोहचतील, अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी बोलून दाखविली. यावेळी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, मुख्याधिकारी चंद्रशेखर गुल्हाने उपाध्यक्षा सरोज भुरे, नगरसेवक सलाम तुरक, आशिष कुकडे, दिपक कठाणे, शालिनी पेठे, मनिष अग्रवाल, वहीद खान, किशोर साखरकर, मोहन बोरधरे, प्रविण बोरकर, सुमेद खापर्डे, सुनिल लांजेवार, जमिल शेख, गणेश मेहर, सुनिल चौधरी यांच्यासह पालकीचे पदाधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)