ॲझोला लागवडीत नागपूर विभागात तुमसर तालुका अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:47+5:302021-06-09T04:43:47+5:30

कोट ॲझोलामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते जमिनीत टाकल्याने कुजते. त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते. ...

Tumsar taluka tops in Nagpur division in Azola cultivation | ॲझोला लागवडीत नागपूर विभागात तुमसर तालुका अव्वल

ॲझोला लागवडीत नागपूर विभागात तुमसर तालुका अव्वल

कोट

ॲझोलामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते जमिनीत टाकल्याने कुजते. त्यापासून उत्तम प्रतीचे सेंद्रिय खत तयार होते. जमिनीत रासायनिक खताची मात्रा कमी लागते. पिकाची वाढ जोमाने होते. हेक्‍टरी १० टन ॲझोला वापरल्यास धान पिकास २५ ते ३० किलो नत्र प्रति हेक्‍टरी मिळते. सेंद्रिय खतांमुळे जमिनीचा पोत सुधारतो. धानाच्या उत्पादनात २० ते २५ टक्क्यांनी वाढ होते.

मिलिंद लाड, उपविभागीय कृषी अधिकारी, भंडारा

कोट

सिंदपुरी व अंबागड येथे ॲझोला बेड तयार करून त्यात ॲझोला कल्चर टाकण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ॲझोलाचा प्रकल्प अवश्य राबवावा. जेणेकरून त्याचा शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होऊन उत्पादन खर्चात बचत होऊन उत्पन्न वाढीस मदत होईल. विकास काळे, तालुका कृषी अधिकारी, तुमसर

Web Title: Tumsar taluka tops in Nagpur division in Azola cultivation