शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर-देव्हाडी रस्ता खड्डेमय

By admin | Updated: November 8, 2014 22:32 IST

तुमसर-देव्हाडी पाच कि़मी. चा रस्ता अक्षरक्ष: खड्डेमय झाला असून या रस्त्याचा सुमारे दररोज २५ हजार नागरिकांना फटका बसत आहे. यामुळे नागरिकांना पाठीचे व मानेचे आजार जडले आहेत.

तुमसर : तुमसर-देव्हाडी पाच कि़मी. चा रस्ता अक्षरक्ष: खड्डेमय झाला असून या रस्त्याचा सुमारे दररोज २५ हजार नागरिकांना फटका बसत आहे. यामुळे नागरिकांना पाठीचे व मानेचे आजार जडले आहेत. अपघाताला आमंत्रण देणाऱ्या रस्त्याची मालकी सध्या संभ्रमात आहे. निवडणुकीपूर्वी १ कोटी ३० लक्षाचा निधी येथून मंजूर झाला होता.तुमसर-देव्हाडी हा रस्ता पाच कि़मी. चा असून शहराला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. रेल्वेस्थानक असल्याने तथा शाळा, महाविद्यालय, व्यापारी व सर्वसामान्य सुमारे २५ हजार नागरिक दररोज या मार्गाने ये-जा करतात. सुमारे दोन ते अडीच कि़मी. चा रस्ता अतिशय खड्डेमय आहे. रस्त्यावर अर्धा फूटाचे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर जिल्हा परिषदेची मालकी होती. जिल्हा परिषदेकडे एकाच रस्त्यावर मोठा निधी खर्च करण्याची परवानगी मिळत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याकडे हा रस्ता वर्ग करण्याच्या हालचाली मागे झाल्या होत्या.जिल्हाधिकाऱ्यांनी या रस्त्यावर सहा ते सात महिन्यापूर्वी दोन ते अडीच लाखाचा निधी दिला होता. या निधीतून काही प्रमाणात खड्डे बुजविण्यात आले होते. रस्त्यावर वर्दळ जास्त असल्याने व जड वाहतुकीमुळे पुन्हा रस्ता खड्डेमय झाला आहे. संबंधित विभागाची येथे पुन्हा निधीची प्रतिक्षा आहे.या रस्त्यावर दररोज लहान अपघात होत आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे पाठीचे व मानेचे आजार जडल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. आॅटोचालकांचे तथा इतर वाहनांची सुद्धा वाताहत होत आहे. नाईलाजाने या मार्गावरूनच मात्र नागरिकांना मार्गक्रमण करणे लागत आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता वर्ग करणे हा एकमेव मार्ग आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या रस्त्यावर १ कोटी ३० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला, परंतु प्रत्यक्षात बांधकामाला केव्हा सुरूवात होईल याची प्रतिक्षा येथे आहे. आमदार चरण वाघमारे यांनी येथे पाठपुरावा करण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)