शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
2
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
3
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
4
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
5
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
6
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
7
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
8
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
9
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
10
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
11
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
12
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
13
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
14
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
15
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
16
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
17
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
18
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
19
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
20
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
Daily Top 2Weekly Top 5

कृष्ठरुग्ण, क्षयरुग्ण शोधमोहिम अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 06:00 IST

अभियाना दरम्यान तालुक्यातील ग्रामीण शहरी व निवडक कॉपेरिशन क्षेत्रातील घरांना आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देवून कृष्ठरोग निर्मूलनाकरिता सर्वेक्षण करणार आहेत. तर कृष्ठरोग उपचारावरील ५६ क्षयरोग ९१, एमडीआर ५ रुग्ण व समाजातील निदान न झालेले कृष्ठरोग लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहे.

ठळक मुद्देएम.ए. मेश्राम : लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात शोध अभियान सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये संयुक्त कृष्ठरोग शोध अभियान, सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम व असंसर्गजन्य प्रतिबंध जागरूकता अभियान १३ ते २८ सप्टेंबर या कालावधित जिल्ह्यातील सर्व ग्रामीण, शहरी व निवडक कॉपेरिशन क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. याकरिता लाखांदूर तालुका समन्वय समिती सभा ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम.ए. मेश्राम यांचे विशेष मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. व्ही. डब्ल्यु. बन्सोड यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी डॉ. जी.एस. कापगते, डॉ. एम.के. चौधरी, डॉ. सी.झेड. नखाते, आर.ई. नखाते, ए.जी. भुसारी, एन.एस. शहारे, आरोग्य सहायक मांढरे, मेंढरे, अश्विनी आत्राम, गणेश आंबिलढुके, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक अनुप हातेल, भारत गणवीर, रवि झोडे, प्रशांत बोरीकर आदी सामाजिक संस्थाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी अभियाना दरम्यान तालुक्यातील ग्रामीण शहरी व निवडक कॉपेरिशन क्षेत्रातील घरांना आरोग्य कर्मचारी घरोघरी भेटी देवून कृष्ठरोग निर्मूलनाकरिता सर्वेक्षण करणार आहेत. तर कृष्ठरोग उपचारावरील ५६ क्षयरोग ९१, एमडीआर ५ रुग्ण व समाजातील निदान न झालेले कृष्ठरोग लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणण्यात येणार आहे. तसेच क्षयरोगाचे निदानाकरिता क्षयरोगाचे निदानाअभावी अद्यापही वंचित असणाऱ्या क्षयरुग्णांचा शोध घेवून त्यांना औषधोपचार देण्यात येणार आहे. असंसर्गजन्य रोगाबद्दल समाजातील ३० व अधिक वयोगटातील लोकांची तपासणी करून उच्च रक्तदाब, मधुमेह व कर्करोग, मुख गर्भाशय व स्तन या रोगाबाबत सनियंत्रणाकरिता सर्वेक्षण करण्यता येणार आहे. १३ ते २८ सप्टेंबर या कालावधीत घरोघरी करण्यात येणाºया सर्वेक्षणाकरिता सर्व जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन प्रशानाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जनतेला केले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य