शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

भरधाव ट्रकने दुचाकी चालकास चिरडले, पत्नीसह पुतण्या गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2020 6:47 PM

भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

लाखांदूर(भंडारा) : लाखांदूर येथून औषधोपचार करून पत्नी व पुतण्या सह दुचाकीने स्वगावी जात असताना अचानक विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. सदर घटना 24 सप्टेंबरला दुपारी पाच वाजताच्या सुमारास लाखांदूर पवनी राज्यमार्गावरील सावरगाव फाट्यानजीक घडली. ईश्वर वासुदेव येरने(40, रा.आसोला) असे जागीच मृत तरुणाचे नाव असून, अश्विनी ईश्वर येरने(35)असे पत्नी व कोसा योगेश येरने(5)असे किरकोळ जखमींची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार घटनेच्या दिवशी मृतक तरुण मालकीचे डिस्कवर कंपनीचे दुचाकी (क्रमांक एम एच 36 आर 23 63)ने लाखांदूर येथून औषधोपचार करून किरकोळ जखमी पत्नी व पुतण्यासह आसोला गावाकडे जात होता.दरम्यान गावानजीकच्या सावरगाव फाट्याजवळ पोहोचताच अचानक विरुद्ध दिशेने येना-या भरधाव ट्रकने दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार झाला तर पत्नी व पुतण्या किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले. मात्र घटनेतील भरधाव ट्रक सुसाट वेगाने घटना स्थळावरून पसार झाला. सदर घटनेची माहिती या मार्गावरील नागरिकांना होताच संबंधितांनी तात्काळ लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. माहितीवरून दिघोरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश गावंडे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद कळसुंगे व अन्य पोलिस कर्मचा-यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले आहे. तर अखमिन्ना उपचारार्थ लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची लाखांदूर पोलिसांनी नोंद केली असून, पसार ट्रकचा शोध सुरू आहे.