शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना जनजागृतीसह संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छाग्रहींना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST

जिल्हा परीषदच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपातळीवर स्वच्छाग्रही म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने पुढाकार घेतला. ग्रामपंचायत स्तरावरून स्वच्छाग्रही प्रशिक्षणात सहभागी झाले.

ठळक मुद्देजिल्हा परिषदचा पुढाकार : नऊशे स्वच्छाग्रही झूम अ‍ॅपद्वारे झाले सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोनाबाबत नागरिकांनी स्वच्छतेच्या सवयी अंगीकारणे व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या उद्देशाने तसेच ग्रामस्तरावर जनजागृती करून आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे नऊशे स्वच्छाग्रहींना कॉम्प्युटर आणि मोबाईलवर झूम अ‍ॅपद्वारे प्रशिक्षीत करण्यात आले.जिल्हा परीषदच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपातळीवर स्वच्छाग्रही म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने पुढाकार घेतला. ग्रामपंचायत स्तरावरून स्वच्छाग्रही प्रशिक्षणात सहभागी झाले. मुख्य कार्यकारी अधिकारी भूवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) राजेश बागडे यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण पार पडले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागडे प्रशिक्षणाद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ग्रामस्तरावर कोविड १९ चा संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छाग्रहींनी योध्दे म्हणून कामे करावे, असे आवाहन केले. या प्रशिक्षणासाठी साधन व्यक्ती म्हणून डॉ. खेडीकर, पाणी गुणवत्ता निरीक्षक हेमंत भांडारकर, माहिती शिक्षण व संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, प्रविण खंडारे, क्षमता बांधणी तज्ज्ञ संजय धोटे, समाजशास्त्रज्ञ प्रकाश उमक, मनुष्यबळ विकास सल्लागार बंडू हिवरे यांची उपस्थिती होती.प्रशिक्षणादरम्यान स्वछाग्रहींना कोरोनाची उपाय योजना व संसर्ग, आंतरव्यक्ती संवादाच्या माध्यमातून जनजागृती करणे, शारीरीक अंतर राखण्यासाठी उपायायोजना, काल्पनीक माहिती आणि गैरसमज, अधिक जोखमीचे गट आणि संभाव्य रूग्ण ओळखणे, मानसिक काळजी, मानहानी व भेदभाव, कोरोनाबाबत समज गैरसमज, सामान्य दिसून येणारे लक्षणे, समुदायामध्ये सुरक्षित सवयी, श्वसनसंस्थेची स्वच्छता, प्रसार होण्याचे मार्ग, हातांची स्वच्छता, मास्कचे प्रकार व उपयोग, मास्कची हाताळणी, फ्रंटलाईन वॉरीयरसाठी खबरदारीच्या आणि सुरक्षितेच्या उपाय योजना, प्रतिबंधात्मक उपाय कुटूंब आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत पिण्याचे पाणी, पाणी साठवण, हाताळणी आणि स्त्रोत स्वच्छता, शौचालयाचा वापर आणि स्वच्छता, मैल गाळ व्यवस्थापन, कोविड संभाव्य आणि बाधित व्यक्ती संबंधी काळजी या सत्रात उपाययोजना आणि प्रतिबंध व सहयोगी वातारवरणाची निर्मिती, घरच्या घरी विलगीकरण व संभाव्य बाधित व्यक्तींचे सुरक्षित वास्तव्य, संभाव्य संक्रमित व्यक्तींच्या घरातील कुटुंबियांना घ्यावयाची खबरदारी, कुटुंबस्तरावरील विलगीकरण केलेल्या घरातील टाकाऊ पदार्थ्यांची योग्य विल्हेवाट, कुटुंबियांची सुरक्षितता, प्रोत्साहन आणि स्वच्छता विषयक अपेक्षित वर्तन, मानहानी व भेदभाव, कोरोनाबाबत गैरसमज आणि संवाद उपक्रम, इतर यंत्रणेसोबत समन्वय, घ्यावयाची काळजी व जनजागृती बाबत तज्ज्ञ साधन व्यक्ती यांनी स्वच्छताग्रहींना मार्गदर्शन केले. तसेच केसस्टडीच्या माध्यमातून विश्लेषणात्मक माहिती दिली.कॉम्प्युटर आणि मोबाईलवर झूम अ‍ॅपद्वारे घेण्यात आलेल्या प्रशिक्षणात भंडारा जिल्ह्यातील सुमारे ९०० स्वछाग्रहींनी सहभागी झाले होते. प्रशिक्षणासाठी क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापूरे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, निखील वंजारी व तालुकास्तरीय गट संसाधन केंद्राचे कर्मचारी यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Socialसामाजिक