किन्ही गावाची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2021 05:00 AM2021-06-12T05:00:00+5:302021-06-12T05:00:22+5:30

कोरोना विरुद्धचा लढा  जिंकण्यासाठी शासनाकडून आरोग्य विभागाच्या पुढाकाराने टप्प्याटप्प्याने सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली गेली. मात्र ग्रामीण भागात लसीकरण विषयी पसरलेल्या विविध अफवांमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर सारून १०० टक्के लसीकरण पूर्तीचे ध्येय गाठण्याच्या हेतूने तालुका आरोग्य प्रशासनाच्या पुढाकाराने तालुक्यात व्यापक स्तरावर लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. 

Towards 100% vaccination of any village | किन्ही गावाची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल

किन्ही गावाची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल

Next
ठळक मुद्देआरोग्य विभागाचे यश : अफवांच्या पार्श्वभूमीवर ठेवला आदर्श

लोकमत न्यूज नेटवर्क
विरली(बु.) : ग्रामीण भागात कोरोना लसीविषयी पसरलेल्या विविध अफवांच्या पार्श्वभूमीवर लाखांदूर तालुक्यातील किन्ही / गुंजेपार  या छोट्याशा खेडेगावाची १०० टक्के लसीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. या गावाने इतरांसमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेचे हे यश आहे.
राबविण्यात आलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेत गावातील ४५ वर्षांवरील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला. लसीच्या पहिल्या डोससाठी ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाले होते.  
९ जूनला घेण्यात आलेल्या लसीकरण शिबिरात दुसऱ्या डोससाठी ४५ वर्षांवरील ९५ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. 
कोरोना विरुद्धचा लढा  जिंकण्यासाठी शासनाकडून आरोग्य विभागाच्या पुढाकाराने टप्प्याटप्प्याने सर्वत्र लसीकरण मोहीम राबविली गेली. मात्र ग्रामीण भागात लसीकरण विषयी पसरलेल्या विविध अफवांमुळे जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम दूर सारून १०० टक्के लसीकरण पूर्तीचे ध्येय गाठण्याच्या हेतूने तालुका आरोग्य प्रशासनाच्या पुढाकाराने तालुक्यात व्यापक स्तरावर लसीकरण जनजागृती मोहीम राबविण्यात आली. 
नागरिकांसाठी बारव्हा येथील आरोग्य उपकेंद्रात लस उपलब्ध करून देण्यात आली होती. या गावात ४५ वर्षांवरील नागरिकांची संख्या जवळपास २१० असून आरोग्य प्रशासनाच्या आकडेवारीनुसार येथे ४५ वर्षांवरील ९५ टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस  घेतले आहेत.  अपवाद वगळता सर्वच युवकांनी आपले दोन्ही डोस पूर्ण केल्याची माहिती येथील ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपाचे तालुका महामंत्री शुभम चिरवतकर यांनी दिली.
    मोहिमेसाठी आरोग्य विभागाच्या एम. बी. खोब्रागडे, आर. आर. बरडे, विरली (बु.) जि. प. शाळेचे मुख्याध्यापक जी. एम. वंजारी, ग्रामपंचायत सदस्य शुभम चिरवतकर, राजेंद्र तुपटे,  रिना भागडकर, आशा सेविका जया नंदागवळी ,  तिलकचंद शहारे, पुरुषोत्तम चिरवतकर, लेकराम भागडकर, शंकर तरारे, सोमेश्वर शहारे, विनायक तरारे, मच्छिंद्र शहारे, शरद शहारे, नकटू शहारे, दशरथ शहारे आदींनी मोलाचे सहकार्य केले.

Web Title: Towards 100% vaccination of any village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.