शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक; गोलंदाजीत अकिल होसीन इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

टायर फुटले, वाहन उलटले; वृद्ध ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2022 05:00 IST

शालिनी या स्वत:च्या  चारचाकी वाहन क्र. एमएच ३३ व्ही ४७३३ ने  साकोलीकडे जात होते. दरम्यान, लाखांदूर-साकोली मार्गावरील दांडेगाव जंगल परिसरात वॅगनआरचा पुढील चाक फुटला. यावेळी टायर फुटून वाहन अनियंत्रित झाले. वाहन महामार्गालगतच्या झाडावर आदळून उलटले. अपघातात शालिनी चिंचेकर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य पाच जण गंभीररीत्या जखमी झाले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : दोन मुलांसह माहेरी आलेल्या बहिणीला चारचाकी वाहनाने सासरी सोडायला जात असताना वॅगनआर कारचा टायर फुटला. यात वाहन रस्त्याच्या कडेला झाडावर आदळून उलटले. अपघातात एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर ५ जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास लाखांदूर-साकोली राज्यमार्गावरील दांडेगाव जंगल शिवारात घडली. शालिनी शामराव चिंचेकर (७०) रा. गडचिरोली असे मृत महिलेचे नाव आहे. प्रियंका काटनकर या हित व सोनायरा या आपल्या दोन मुलांसह काही दिवसांपूर्वी गडचिरोली येथे माहेरी मुक्कामी गेली होती. माहेरी काही दिवस थांबल्यानंतर रविवारी  प्रियंका व तिच्या मुलांना सासरी सोडण्याकरिता प्रियंकाचा भाऊ अभिषेक, आई कल्पना व आजी शालिनी या स्वत:च्या  चारचाकी वाहन क्र. एमएच ३३ व्ही ४७३३ ने  साकोलीकडे जात होते.दरम्यान, लाखांदूर-साकोली मार्गावरील दांडेगाव जंगल परिसरात वॅगनआरचा पुढील चाक फुटला. यावेळी टायर फुटून वाहन अनियंत्रित झाले. वाहन महामार्गालगतच्या झाडावर आदळून उलटले. अपघातात शालिनी चिंचेकर या वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, अन्य पाच जण गंभीररीत्या जखमी झाले. अपघात प्रवासी नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ दिघोरी मोठी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहितीवरून दिघोरी मोठीचे  सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक ग्यानिराम गोबाडे, पोलीस नायक घनश्याम कोडापे, उमेश वलके, पोलीस अंमलदार वनमाला भोंदे, पोलीस सैनिक चुन्नीलाल लांजेवार, देशमुख आदी पोलीस अधिकारी कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करीत जखमींना उपचारार्थ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. या घटनेची नोंद दिघोरी मोठी पोलिसांनी घेतली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक हेमंत पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

जखमींची नावे- या अपघातात अभिषेक नंदकिशोर चिंचेकर (२७), कल्पना नंदकिशोर चिंचेकर (४४) दोन्ही रा. गडचिरोली, प्रियंका रमनकुमार काटनकर (२९), हित रमणकुमार काटनकर (४), सोनायरा रमनकुमार काटनकर (२) तिन्ही, रा. साकोली, असे एकूण ५ जण अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. 

 

टॅग्स :Accidentअपघात