शहरं
Join us  
Trending Stories
1
"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
2
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
3
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
4
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
5
RCB vs MI : दीपक चाहरचा कहर! 'गोल्डन डक'सह किंग कोहलीवर ओढावली 'ही' नामुष्की
6
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
7
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
8
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
9
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
10
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
11
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
12
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
13
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
14
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
15
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
16
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
17
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
18
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
19
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
20
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
Daily Top 2Weekly Top 5

४०० रेल्वे व्हेंडर्सवर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 05:00 IST

हाताला काम मागण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. कुणी भाजी विक्री करीत आहे तर कुणी मिळेल ती कामे करीत आहे. अल्प मजूरीवर संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. नागपूर विभागातील मोठ्या रेल्वे स्थानकावर रेल्वे व्हेंडर्सची संख्या मोठी आहे. इतर कामे न केल्याने त्यांना मजूरी कमी मिळत आहे. एकदा प्रवाशी गाड्या सुरु होतात याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.

ठळक मुद्देकिरकोळ कामे करुन उदरनिर्वाह : मदतीची गरज, कुटुंबावर मोलमजुरीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : नागपूर विभागातील सुमारे ४०० रेल्वे व्हेंडर्सवर उपासमारीची वेळ आली आहे. मागील पाच महिन्यापासून प्रवाशी रेल्वे गाड्या बंद आहेत. त्यामुळे किरकोळ मजूरीची कामे करुन उदरनिर्वाह करावा लागत आहे. कोरोना संकटकाळात शासनाने मदत करण्याची गरज आहे.
नागपूर विभागातील प्रत्येक रेल्वे स्थानकात रेल्वे व्हेंडर्सची मोठी संख्या आहे. प्रवाशांना पाण्यापासून तर नाश्ता, चहा, किरोळ साहित्य विक्री व्हेंडर्स प्रवाशी गाड्यात करतात. मार्च महिन्यात कोरोनाचा संक्रमण वाढू नये याकरिता रेल्वे प्रशासनाने प्रवाशी रेल्वे गाड््या बंद केल्या. त्यामुळे रेल्वे व्हेंडर्स बेरोजगार झाले. नागपूर विभागात आठवड्यात मुंबई-हावडा व हावडा अमहदाबाद दोन प्रवाशी गाड्या आठवड्यातून एकदाच धावत आहेत. इतर सर्व प्रवाशी रेल्वे गाड्या बंद आहेत. त्यामुळे रेल्वे व्हेंडर्सना मोठा फटका बसला आहे.

मोलमजुरी करुन उदरनिर्वाह
कुटुंबाचे पोट भरण्याकरिता रेल्वे व्हेंडर्सनी सध्या मोलमजूरी करणे भाग पडत आहे. हाताला काम मागण्याकरिता वणवण भटकावे लागत आहे. कुणी भाजी विक्री करीत आहे तर कुणी मिळेल ती कामे करीत आहे. अल्प मजूरीवर संपूर्ण कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न त्यांना पडला आहे. नागपूर विभागातील मोठ्या रेल्वे स्थानकावर रेल्वे व्हेंडर्सची संख्या मोठी आहे. इतर कामे न केल्याने त्यांना मजूरी कमी मिळत आहे. एकदा प्रवाशी गाड्या सुरु होतात याकडे त्यांचे लक्ष लागून आहे.
रेल्वेस्थानकावर शुकशुकाट
ऐरवी प्रवाशांच्या गर्दीने भरलेले रेल्वेस्थानकावर सध्या शुकशुकाट आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांशिवाय रेल्वे स्थानकावर कुणीच दिसत नाही. सर्वांना पुन्हा प्रवाशी रेल्वे गाड्या सुरु होण्याची प्रतीक्षा आहे.

मागील पाच महिन्यापासून प्रवशी रेल्वेगाड्या बंद आहेत. त्यामुळे रेल्वे व्हेंडर्सवर मोलमजूरी करण्याची पाळी आली आहे. संपूर्ण कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे असा प्रश्न पडला आहे. शासनाने व्हेंडर्सना आर्थिक मदत करावी.
- शेखर ठवकर,
रेल्वे व्हेंडर्स, प्रतिनिधी तुमसर रोड

टॅग्स :railwayरेल्वे