शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

तीन किलोमीटरसाठी तीन तासांचा प्रवास

By admin | Updated: July 21, 2014 23:42 IST

उन्हाळ्यात रेतीची जड वाहतूक तर पावसाळ्यात रस्त्यावर चिखल यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरले. वाहनांसाठी हा मार्ग जवळपास बंद असल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत आहे.

लाखांदूर : उन्हाळ्यात रेतीची जड वाहतूक तर पावसाळ्यात रस्त्यावर चिखल यामुळे रस्त्यावर पडलेले खड्डे नागरिकांसाठी जीवघेणे ठरले. वाहनांसाठी हा मार्ग जवळपास बंद असल्याने विद्यार्थ्यांची शाळा बुडत आहे. जिल्हा प्रमुख मार्ग २२ या नावाने कोळखला जाणारा हा मार्ग सध्या सार्वजनिक बांधकामाला शोधूनही सापडणार नाही अशी स्थिती या मार्गाची झाली आहे.चप्राड ते सिंदपुरी जिल्हा प्रमुख म ार्ग २२ हा चौरास भागातील डांभेविरली, गवराळा, मोहरना, खैरना, नांदेळ, दोनाड, विरली मार्गे सिंदपुरीला जोडतो. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत हा मार्ग येतो. दरवर्षी या मार्गाच्या डागडुगीकरिता शासन लाखो रुपयाचा निधी खर्च करतो. मागील वर्षी याच मार्गावर १२ मोऱ्यांचे निकृष्ट बांधकाम करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात निधी खर्च करूनही नागरिकांना वाहतुकीसाठी रस्त्याच्या सुविधा ुउपलब्ध करून देण्यास संबंधित विभाग अपयशी ठरला आहे. याच मार्गाने मोहरना, गनराळा, डांबेविरली, नांदेड, दोनाड, कुडेगाव या गावातील शेकडो विद्यार्थी तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये जा करतात. यासाठी मानव विकास कार्यक्रमांतर्गत बसची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु रस्त्यावर मोठमोठे खड्डे चिखल व संपूर्ण रस्ते उखडल्याने बस बंद झाली. दुचाकीसाठी हा मार्ग अपघातग्रस्त ठरला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत जाणे बंद केले. नागरीकांनी तालुक्याच्या कामासाठी येणे बंद केले. आरोग्याच्या दृष्टीने रुग्णाला तालुक्यात आणण्यासाठी वाहनधारक तयार होत नाही. नाईलाजास्तव दुचाकीने धोका पत्करुन जीवन जगण्याची उमेद जागवली जाते. या भागातील रस्त्यांच्या डागडुगीसाठी दरवर्षी निधी खर्च होतो. मात्र जड रेतीची वाहतुकीने दोन चार महिन्यात रस्त्यांची खस्ता हालत नागरिकांसाठी डोकेदुखी ठरते. पावसाळ्याच्या दिवसात रोवणी केलेले ट्रॅक्टर चिखल रस्त्यावर आणून पाडल्याने दुचाकीच्या अपघातात वाढ होत आहे. एकुणच हा जिल्हा प्रमुख मार्ग चौरास भागातील नागरिकांसाठी जीवघेणा ठरला असून लोकप्रतिनिधींनी सुद्धा याकडे डोळेझाक केली आहे. ग्रामपंचायतस्तरावर नाहरकत प्रमाणपत्र न देता ही प्रशानामार्फत रेतीघाटाचे लिलाव करून अवैध जड रेती वाहनांना परवानगी दिली जाते .याचा फटका नागरिकांना सहन करावा लागत आहे. तीन कि.मी. अंतर कापण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.(तालुका प्रतिनिधी)