शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या विक्रीप्रकरणी तीन आरोपींना अटक

By admin | Updated: September 21, 2016 00:28 IST

करडी व रोहा येथील दोन इसमांनी एका ३० वर्षीय, दोन मुलांची आई असलेल्या विधवा महिलेचा लग्नाचे आमिष दाखवून जळगाव...

करडी पोलिसांची कामगिरी : आणखी एका आरोपीच्या अटकेची शक्यताकरडी (पालोरा) : करडी व रोहा येथील दोन इसमांनी एका ३० वर्षीय, दोन मुलांची आई असलेल्या विधवा महिलेचा लग्नाचे आमिष दाखवून जळगाव येथील चार जणांसोबत ७० हजारांत विक्रीचा सौदा केला. सौद्यातील ५० हजारांची रक्कम देतो म्हणून आरोपींनी आळीपाळीने बलात्कार केल्याची तक्रार फिर्यादी महिलेने करडी पोलिसात दिल्या प्रकरणी शोध पथकाने माडगी व देव्हाडी येथून १९ सप्टेंबर रोजी राजू खंडरे रा.करडी व अशोक गायधने रा.रोहा तसेच सौद्यातील प्रकाश पाचोळे रा.आंबाडी (सिल्ली) यांना अटक केली. आणखी एका आरोपीला अटक होण्याची शक्यता आहे.जिल्हा गोंदियातील देवरी तालुक्यातील चिचगड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ककोडी येथील दोन मुलांची आई असलेल्या गरीब महिलेच्या पतीचा ५ वर्षापूर्वी मृत्यू झाला. गावातच एकाकी जीवन जगत असताना ती भंडारा तालुक्यातील कारधा येथील मावशीच्या गावी यायची. दरम्यान तिची ओळख सिल्ली येथील प्रकाश पाचोळे सोबत झाली. त्यांचे माध्यमातून करडी रोहा येथील राजू खंडरे व अशोक गायधने यांचेशी ओळख झाली. दहा ते पंधरा दिवसांपूर्वी ती मावशीच्या गावी कारधा येथे आली होती. त्या दरम्यान दोन्ही आरोपींनी तिला लग्नाचे आमिष दाखवून जळगाव येथील चार इसमांसोबत तिचा ७० हजारात विक्रीचा सौदा केला होता. लग्नाची गोष्ट पक्की झाल्याचे तिला सांगण्यात आले होते.दोन्ही आरोपींनी तिला सौद्यातील ५० हजार रुपये देतो, म्हणून कारध्यावरून सायंकाळच्या सुमारास दुचाकीने करडी गावी आणले. तिला पाहून यांच्यातील सैतान जागा झाला. बहाणा करून त्यांनी तिला करडी वरून देव्हाडा ते साकोली मार्गाने मोहगाव ते निलज बुज. दरम्यान पांदन रस्त्याला नेवून रात्री ८.३० वाजताचे दरम्यान तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. प्रकरणी करडी पोलिसात सदर महिलेने दि. १७ सप्टेंबर रोजी तक्रार केली. कलम ३७६ (२), (ड) भादंवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात अला. गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी गावातून पसार झाले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी जोगदंड व करडीचे ठाणेदार प्रभाकर बोरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक ठाणेदार कटरे, पोलीस हवालदार गौतम, सोलंकी यांचे शोध पथक तयार करण्यात आले. अखेर शोख पथकाने माडगी व देव्हाडी येथून तिन्ही आरोपींनी रात्री ८.३० वाजताचे दरम्यान अटक केली. आरोपींचे बयाण घेण्यात आले असून मोहाडी न्यायालयात हजर करण्यात आले आहे. (वार्ताहर)