शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळतोय, रुग्णसंख्या नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

कोरोनाच्या पहिल्या लाटेवर भंडारा जिल्ह्याने यशस्वी नियंत्रण मिळविले. मात्र, गत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. संपूर्ण राज्यासह भंडारा जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढू लागली. १८ एप्रिलपर्यंत रुग्णवाढीचा वेग कायम होता. १२ एप्रिलला जिल्ह्यात सर्वाधिक १५९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर १ मार्च रोजी सर्वाधिक ३५ मृत्यूची नोंद झाली. वाढत्या रुग्णसंख्येने सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले होते.

ठळक मुद्देरिकव्हरी रेट ९५.३८ टक्के : बुधवारी पाच जणांचा मृत्यू, ८६ पाॅझिटिव्ह

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाने भयभीत झालेल्या जिल्ह्यातील नागरिकांना आता दिलासा मिळत असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका टळत असून रुग्णसंख्याही नियंत्रणात आहे. बुधवारी ४०३ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या तर ८६ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९५.३८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे. दुसरी लाट ओसरत असली तरी धोका मात्र कायम आहे.कोरोनाच्या पहिल्या लाटेवर भंडारा जिल्ह्याने यशस्वी नियंत्रण मिळविले. मात्र, गत मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाची दुसरी लाट आली. संपूर्ण राज्यासह भंडारा जिल्ह्यातही रुग्णसंख्या वाढू लागली. १८ एप्रिलपर्यंत रुग्णवाढीचा वेग कायम होता. १२ एप्रिलला जिल्ह्यात सर्वाधिक १५९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर १ मार्च रोजी सर्वाधिक ३५ मृत्यूची नोंद झाली. वाढत्या रुग्णसंख्येने सर्वत्र भयभीत वातावरण निर्माण झाले होते. रुग्णालयात खाटा मिळणे कठीण झाले होते. ऑक्सिजनसाठीही दमछाक होत होती. अशास्थितीत जिल्हा प्रशासनाने ब्रेक द चेन अंतर्गत विविध उपाययोजना राबविल्या. त्यात २२ एप्रिलला सर्वाधिक १५६८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यानंतर आतापर्यंत पाॅझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होण्याऱ्यांची संख्या अधिक आहे. १९ एप्रिलला रुग्ण बरे होण्याचा दर ६२.५८ टक्के एवढा खाली आला होता. आता तो ९५.३८ टक्क्यांवर गेला आहे. पाॅझिटिव्हीटी रेट ५.३३ झाला आहे.

५४ हजार ९२२ व्यक्तींची कोरोनावर मात  जिल्ह्यात बुधवारी ४०३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आतापर्यंत ५४ हजार ९२२ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. बुधवारी ८६ नवे रुग्ण आढळून आले असून त्यात भंडारा २०, मोहाडी ६, तुमसर ११, पवनी ५, लाखनी ६, साकोली २१ आणि लाखांदुर तालुक्यातील १७ जणांचा समावेश आहे. पाच जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून आता कोरोना बळींची संख्या १०३५ वर गेली आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन व वैद्यकीय यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांटसह ७५ खाटांचे रुग्णालय उभारले जात आहेत. सनफ्लॅग कारखान्याजवळ ५०० खाटांचे जम्बो रुग्णालय उभारले जाणार आहे.-संदीप कदम, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या