शहरं
Join us  
Trending Stories
1
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
2
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
3
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
4
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
5
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
6
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
7
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
8
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
9
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
10
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
11
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
12
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
13
बाप रे! आधी कलिंगड खाल्लं, मग मॅगी...; एकाच कुटुंबातील ९ जणांना झाली विषबाधा, रुग्णालयात धावपळ
14
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
15
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
16
धार भोजशाळा 'सरस्वती मंदिर'च! HC कडून हिंदूंना पूजेचा अधिकार, नमाजचा आदेश रद्द; आली मुस्लीम पक्षाची पहिली प्रतिक्रिया
17
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
18
सावधान! स्मार्टफोनचा रिकामा डबा कचरा समजून फेकून देताय? थांबा, मिळू शकतो लाखोंचा फायदा
19
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
20
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो लिटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2020 06:00 IST

शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी घालण्याचे कार्य सुरु आहे. अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असल्याने लहान मोठे प्रसंग उद्भवतात. यात कधी दूरध्वनी केबल उखडने, नळधारकांना जोडणी दिलेले जलवाहिनी तुटणे, अंतर्गत विद्युत केबल खराब होणे आदी समस्या उद्भवत आहेत. अशाच प्रकार देशबंधु वॉर्डाकडे जाणाऱ्या चौकात घडला.

ठळक मुद्देदोन दिवसानंतर दुरुस्ती : खोदकामावेळी फुटली जलवाहिनी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : शहरात शुध्द पाणीपुरवठ्याचा विषय ज्वलंत असतानाच खोदकामादरम्यान जलवाहिनी फुटली. यात हजारो लिटर पाणी व्यर्थ वाहून गेले. हा प्रकार भंडारा शहरातील खांबतलाव चौक ते शास्त्रीनगर चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडला. विशेष म्हणजे दोन दिवसांपासून पाणी वाया गेले. दरम्यान रविवारी दुपारच्या सुमारास जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली.
शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी घालण्याचे कार्य सुरु आहे. अनेक ठिकाणी खोदकाम सुरु असल्याने लहान मोठे प्रसंग उद्भवतात. यात कधी दूरध्वनी केबल उखडने, नळधारकांना जोडणी दिलेले जलवाहिनी तुटणे, अंतर्गत विद्युत केबल खराब होणे आदी समस्या उद्भवत आहेत. अशाच प्रकार देशबंधु वॉर्डाकडे जाणाऱ्या चौकात घडला. जलवाहिनी घालण्यासाठी खोदकाम करीत असतांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. शनिवारीही शेकडो लिटर पाणी जलवाहिनीतून बाहेर निघून रस्त्यावर वाहून गेले. रविवारीही सकाळी नळ आल्यानंतर हीच स्थिती होती.
पाऊस बरसल्यावर जसे पाणी वाहून जाते तसे रस्त्यावरुन जोरदार प्रवाहात वाहत होते. जलकुंभातून निघून नळधारकांना पाणी मिळणे अपेक्षीत होते. मात्र जलवाहिनीच फुटल्याने शनिवार व रविवारला परिसरातील नळधारकांना पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. याबाबत येथील स्थानिक रहिवाश्यांनी पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला केली. मात्र याची शनिवारी याची डागडुजी करण्यात आली नाही. मात्र दुपारी जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. उशिरा का असेना दुरुस्ती झाली असली तरी दोन दिवसपर्यंत मात्र हजारो लिटर पाणी वाया गेले. आधीच शहरात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरु आहे. अशावेळी जलवाहिनीच्या कामात दिरंगाई नागरिकांच्याच जिव्हारी लागते.

नगरसेवक रजनिश मिश्रा यांनी याबाबत अवगत केले होते. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युध्द पातळीवर सुरु करण्यात आले. मुख्य पाईप दुरुस्त करण्यात आले आहे.
- दिनेश भुरे, न.प. उपाध्यक्ष

टॅग्स :Waterपाणी