शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

साडेपाच कोटीचे कृषी पंप वीज देयक थकीत

By admin | Updated: February 25, 2016 00:25 IST

घरगुती वीज बिलासह ग्राम पाणी पुरवठा योजनेच्या वीज बिलाची सक्तीने वसुली होत असताना राजकीय नेत्यांच्या ...

पदाधिकाऱ्यांची आडकाठी : घरगुती विजेसह पाणीपुरवठा योजनेची सक्तीची वसुलीलाखांदूर : घरगुती वीज बिलासह ग्राम पाणी पुरवठा योजनेच्या वीज बिलाची सक्तीने वसुली होत असताना राजकीय नेत्यांच्या आडकाठीमुळे लाखांदूर तालुक्यात तब्बल साडेपाच कोटी रुपयाचे कृषी पंप वीज बिल थकीत असल्याचे उघडकीस आले आहे. धान उत्पादनात अग्रेसर व सिंचन सुविधायुक्त लाखांदूर तालुक्यात जवळपास साडेपाच हजार कृषी पंप धारक शेतकरी आहेत. खरीप, रबी व उन्हाळी धानपिकाचे या भागात मोठ्या प्रमाणात उत्पादन देखील घेतले जाते. कृषी पंपाचा वापर करून या सर्व हंगामात विविध पिकांचे उत्पादन घेताना मात्र तब्बल साडेपाच कोटी रुपयाचे वीज बिल थकीत असल्याचे उघडकीस आले आहे. घरगुती वीज बिल वसुली करताना महिन्यागत वीज खंडीत करण्याच्या कारवाईने जनसामान्यात भीती असतानाच अनेक गावातील पाणीपुरवठा योजनेचे वीज बिलाचा विहीत मुदतीत भरणा न झाल्यास चक्क पाणीपुरवठा योजनेची वीज खंडीत झाल्याची माहिती आहे. मात्र शेतकऱ्यांचा कैवार घेत राजकीय नेत्यांच्या आडकाठीमुळे तालुक्यातील सुमारे साडेपाच हजार कृषीपंप धारकाकडे तब्बल साडेपाच कोटीचे वीज बिल थकीत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, अपुऱ्या पावसामुळे वीज निर्मिती केंद्रात वीज उत्पादन होताना अनेक अडचणी निर्माण होत असताना देखील नक्षल प्रभावित लाखांदूर तालुक्यात लोडशेडींगचा फटका बसणार नसल्याची माहिती देण्यात आली. व्यावसायिकांसह शेतकऱ्यांना मुबलक वीज उपलब्ध करून देणाऱ्या शासनाकडून मात्र कृषी पंपधारकांकडून वीज बिल वसुली अंतर्गत कारवाई केली असता राजकीय नेत्यांकडून आडकाठी केली जात असल्याने वीज वितरण कंपनीमार्फत पुरेशी कारवाई करताना अनेक अडचणी निर्माण होत असल्याची चर्चा आहे. एकीकडे कृषी पंपाद्वारे सुामर पाण्याचा उपसा होताना व विविध पिकांचे उत्पादन घेताना जलसंकटाचे भयाण संकट दृष्टीपथात येत असले तरी सर्वसामान्य नागरिकांना पाणीपुरवठा करणारी योजना व घरगुती वीज खंडीत करताना कोण्या राजकारण्यांनी दखल घेतली नाही. मात्र शेतकऱ्यांचा कैवार घेत राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे लाखांदूर तालुक्यात जवळपास साडेपाच कोटी रुपयाचे कृषी पंप वीज बिल थकीत ठरले आहेत. (तालुका प्रतिनिधी)