शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लाकडांची लावली परस्पर विल्हेवाट!

By admin | Updated: August 27, 2016 00:19 IST

नगरपालिका हद्दीतील भंडारा वनविभागाच्या विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील सागवान व आडजात वृक्षांची कत्तल केली.

कनिष्ठांवर दबावतंत्र : प्रकरण परवानगीविना वृक्षतोडीचेप्रशांत देसाई भंडारानगरपालिका हद्दीतील भंडारा वनविभागाच्या विभागीय कार्यालय व वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील सागवान व आडजात वृक्षांची कत्तल केली. या वृक्षतोडीला परवानगीच मिळाली नसल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. यामुळे यात दोषी असलेल्या वनाधिकाऱ्यांनी स्वत:ला वाचविण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांवर दबावतंत्र सुरू केला असून कागृदपत्रांची जमवाजमव सुरू केली आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयाचे विस्तारीकरण करण्याच्या नावावर येथील वनविभगाच्या विभागीय व वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या आवारातील सागवान व आडजात वृक्षांची आॅक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यात तोड केली. या बाबीला आता दहा महिन्यांचा कालावधी लोटला असतानाही तोडलेल्या वृक्षांपैकी केवळ ११ सागवान व एक जांभूळ वृक्षाची कटाई करण्याची परवानगी नगरपालिका प्रशासनाने दिली होती. उर्वरित ८० सागवान व १२९ आडजात वृक्षांना तोडण्याची परवानगी नसतानाही त्यांची परवानगीविनाच तोड करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला.दहा महिन्यापूर्वी या दोन्ही कार्यालय परिसरातील मोठ्या प्रमाणात वृक्ष कटाई करण्यात आली आहे. ऐवढे दिवस वृक्ष कटाई करण्याची परवानगी पालिकेकडून मिळालेली नसतानाही वनविभाग चूप्पी साधून होता. यावरून तोडलेल्या लाकडांपैकी अनेक लाकडांची अफरातफर करण्यासाठीच वनाधिकाऱ्यांनी पालिकेकडून परवानगी घेण्यास पुढाकार घेतला नसल्याचे आता वनकर्मचाऱ्यांमध्ये बोलले जात आहे. एखाद्या नागरिकांनी त्यांच्या अखत्यारितील सागवान वृक्षाची तोड केल्यास वनविभाग ताबडतोब कारवाईसाठी धावतो. येथे मात्र, वनविभागानेच वृक्षतोड केल्याने वनाधिकाऱ्यांवर आता कोण कारवाई करेल असा प्रश्न उपस्थित होत आहे. वृक्षतोडीनंतर घेतली परवानगीवनाधिकाऱ्यांनी परवानगी न घेता १२ वृक्षांची तोड केली. ही बाब त्यांच्या लक्षात येताच त्यांनी वृक्ष कटाईनंतर पालिकेकडे वृक्ष कटाईची परवानगी मागितली. मात्र ही परवानगी त्यांना वृक्ष कटाईच्या पूर्वीच्या तारखेत हवी असल्याने पालिका व वनाधिकाऱ्यांच्या संगणमताने मागील तारखेत परवानगी दिल्याचे कागदपत्र तयार करण्यात आले. यावरूनच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पहिल्या वृक्ष कटाईतून स्वत:ला वाचविले असले तरी, उर्वरित वृक्ष कटाईतूनही वाचण्यासाठी खटाटोप सुरू आहे.मी नव्याने रूजू झालेलो आहे. परवानगीबिना वृक्ष कटाई केली असल्यास या गंभीर प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याच्या दृष्टिने या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतो. परवानगी नसल्यास कारवाई होईल.- उमेश वर्मा,उपवनसंरक्षक भंडारा