शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
5
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
7
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
8
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
9
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
10
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
11
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
12
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
13
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
14
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
15
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
16
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
17
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
18
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
19
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
20
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
Daily Top 2Weekly Top 5

40 किलो वजनात 400 ग्रॅम धानाची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2022 05:00 IST

शेतकऱ्यांची लुट होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसिलदार व करडीचे ठाणेदार यांना शेतकऱ्यांनी केली होती. प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्तात मोहाडी तालुका अन्न पुरवठा निरिक्षक सागर बावरे यांनी शेतकऱ्यांचे बयाण नोंदवित वजनमापे करडी पोलीस स्टेशनला जमा केली होती. ७ जानेवारी रोजी वैधमापन शास्त्र विभाग तुमसरचे निरिक्षक एम.डी. तोंडरे व साकोली विभागाचे निरिक्षक डी.सी. खुरसुंडे यांनी बजन मापांची तपासणी केली.

लाेकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : मोहाडी तालुक्यातील करडी येथील जय किसान बहूउद्दशीय सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने बोरी येथे खुल्या आवारात सुरू धान खरेदी केंद्रात वजनमापात तफावत व लूट होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती. शुक्रवार रोजी करडी पोलीस ठाणेच्या आवारात वैधमापनशास्त्र विभाग तुमसर व साकोली येथील निरिक्षकांच्या चमूने शेतकऱ्यांच्या समक्ष केलेल्या तपासणीत वजनमापे नूतनीकरण झालेले नव्हते. तसेच ४० किलो वजनात ४०० ग्रॅमची तफावत आढळून आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.शेतकऱ्यांची लुट होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा पणन अधिकारी, तहसिलदार व करडीचे ठाणेदार यांना शेतकऱ्यांनी केली होती. प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्तात मोहाडी तालुका अन्न पुरवठा निरिक्षक सागर बावरे यांनी शेतकऱ्यांचे बयाण नोंदवित वजनमापे करडी पोलीस स्टेशनला जमा केली होती. ७ जानेवारी रोजी वैधमापन शास्त्र विभाग तुमसरचे निरिक्षक एम.डी. तोंडरे व साकोली विभागाचे निरिक्षक डी.सी. खुरसुंडे यांनी बजन मापांची तपासणी केली. वजन मापे नूतनीकरण झालेले नव्हते. तसेच दोन्ही काट्यांची प्रमाणित वजनाने तपासणी केली असता ४० किलोग्रॅम धान खरेदी करतांना ४०० ग्रॅम वजन जास्त घेत असल्याचे उघड झाले. तपासणीवेळी तक्रार शेतकरी सियाराम साठवणे करडी, प्रशांत बावणकर करडी तर पंच साक्षदार म्हणून शेतकरी मगेश साठवणे, पुंडलीक ढबाले, राजेश भडके, रामकृष्ण ढबाले, प्रकाश डोरले, भुवनेश्वर लोंदासे, गणेश ठवकर, योगेश साठवणे, पांडुरंग पंचबुद्धे, मंगल भोयर, सुभाष येळणे प्रामुख्याने उपस्थित होते. दोन्ही इलेक्ट्रॉनिक्स काट्यांची पंच व तक्रारदार शेतकऱ्यांसमक्ष सिलबंद करून ताब्यात घेण्यात आले. तसेच वैधमापनशास्त्र अधिनियम नियमानुसार खटला दाखल करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

केंद्र कायमचे बंद व नुकसान भरपाई द्या- धानाची चोरी व अवैधरित्या शेतकऱ्यांची लूट करणारे करडी येथील केंद्र काळया यादीत टाकून कायमचे बंद करण्यात यावे. शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात यावी, नवे केंद्र सुरू करण्यात यावे. तसेच केंद्र संचालकांवर कठोर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. धानाची मलाई कायम राखण्यासाठी तसेच कारवाई टाळण्यासाठी धावपळ सुरू असून राजकीय पक्ष बदल करण्याच्या तयारीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी