शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णाने काढला व्हिडिओ अन् डॉक्टर अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 05:00 IST

आदिवासी कर्मचाऱ्याला काठी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबणाऱ्या डॉक्टरांचा हा व्हिडिओ बुधवार सायंकाळपासून जिल्ह्यात व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अन्यायग्रस्त आदिवासी कर्मचाऱ्याला न्याय मिळावा म्हणून आदिवासी संघटना एकवटल्या. एमबीबीएसपर्यंत शिक्षण झालेला डॉ. सागर कळसकर हा बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने माणुसकीला काळिमा फासत एका सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली.

राहूल भुतांगेलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ‘तू ड्युटी बरोबर करीत नाही,’ असे म्हणत डॉक्टरने परिचराला जवळ बोलावले आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हातातील काठीने आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार त्याच रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला आणि डॉक्टर थेट कारागृहात पोहोचला. तुमसर तालुक्यातील गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात घडलेल्या घटनेचा व्हिडिओ कुणी काढला, अशी चर्चा असताना एका रुग्णाने तो चित्रित केल्याचे पुढे आले आहे.तुमसर तालुक्यातील आदिवासी बहुल गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर सागर दिलीप कळसकर (२९) याने परिचर नारायण गोमा उईके (५२) याला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. मंगळवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ बुधवारी व्हायरल झाला. आदिवासी संघटना आक्रमक झाल्या. डॉक्टरांच्या अटकेची मागणी करू लागल्या. शेवटी बुधवारी रात्री डॉक्टरवर गुन्हा दाखल करून गुरुवारी त्याला अटकही करण्यात आली. मात्र आरोग्य केंद्रातील हा व्हिडिओ कुणी काढला? अशी चर्चा आज दिवसभर भंडारा जिल्ह्यात होती. दरम्यान, हा व्हिडिओ त्याच आरोग्य केंद्रात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाने काढल्याचे पुढे आले. हा व्हिडिओ चित्रित झाला नसता तर डॉक्टरचा हा महाप्रताप पुढे आला नसता आणि सर्वसामान्य परिचर आपल्या मारहाणीची तक्रार देण्यासाठी पोलिसातही गेला नसता. आदिवासी संघटनांनी हा व्हिडिओ पाहून आंदोलनाचा इशारा दिला आणि डॉक्टर गजाआड झाला.

आदिवासी संघटना एकवटल्या- आदिवासी कर्मचाऱ्याला काठी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून गळा दाबणाऱ्या डॉक्टरांचा हा व्हिडिओ बुधवार सायंकाळपासून जिल्ह्यात व्हायरल झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. अन्यायग्रस्त आदिवासी कर्मचाऱ्याला न्याय मिळावा म्हणून आदिवासी संघटना एकवटल्या. एमबीबीएसपर्यंत शिक्षण झालेला डॉ. सागर कळसकर हा बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने माणुसकीला काळिमा फासत एका सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. या अशोभनीय घटनेचा आदिवासी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच डॉक्टरवर कडक कारवाई करण्याची मागणी गोबरवाहीचे ठाणेदार दीपक पाटील यांच्यामार्फत वरिष्ठांकडे केली.

आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप-  वैद्यकीय अधिकाऱ्याने आरोग्य कर्मचाऱ्याला केलेल्या मारहाणीमुळे जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या कर्मचाऱ्याला न्याय मिळावा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी आरोग्य कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

 

टॅग्स :doctorडॉक्टरPoliceपोलिस