शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
4
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
7
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
8
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
9
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
10
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
11
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
12
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
13
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
14
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
15
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
16
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
17
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
18
मराठी भाषेसाठीचा कायदा काय सांगतो?; व्यवहारात वापर वाढवणे ही प्रत्येक नागरिकाचीही जबाबदारी
19
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
20
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईन, कोरोनाने वाढविली पालकांची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 05:00 IST

दहावी व बारावीचे वर्ष म्हणजे जीवनाचे टर्निंग पॉइंट समजले जाते. काेरोनामुळे दोन्ही परीक्षा उशिरा होणार आहेत  भंडारा जिल्ह्यातून इयत्ता दहावीला १८ हजार  तर इयत्ता बारावीला १५ हजाराच्यांवर परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थी संख्या लक्षात घेता कोरोनाचा फैलाव होऊ नये हीच चिंता पालकांना सतावत आहे.

ठळक मुद्देसुरक्षितता महत्वाची : पालक म्हणतात, कॅरीअरसह आरोग्य जपणे गरजेचे

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा  :  कोरोनाच्या सावटात इयत्ता पाचवी ते बारावीच्या शाळा सुरू झाल्या.   इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार आहेत कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने घोषित केलेल्या या निर्णयामुळे पालकांमध्ये थोडीफार का असेना चिंतेचे वातावरण पसरले आहे कॅरियरसोबत आरोग्य जपणेही महत्त्वाचे आहे, असा सूरही पालकगण व्यक्त करीत आहेत.दहावी व बारावीचे वर्ष म्हणजे जीवनाचे टर्निंग पॉइंट समजले जाते. काेरोनामुळे दोन्ही परीक्षा उशिरा होणार आहेत  भंडारा जिल्ह्यातून इयत्ता दहावीला १८ हजार  तर इयत्ता बारावीला १५ हजाराच्यांवर परीक्षेला बसणार आहेत. विद्यार्थी संख्या लक्षात घेता कोरोनाचा फैलाव होऊ नये हीच चिंता पालकांना सतावत आहे.

दहावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

पार्श्वभूमीवर विद्यार्थी संख्या लक्षात घेता कोरोनाचा फैलाव होऊ नये, याची काळजी शिक्षण मंडळाने अगत्याने घेणे महत्वाचे आहे.- दिलीप गोन्नाडे,  पालक

दहावीची परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांची व्यवस्था करणे आव्हानात्मक काम आहे.-  सुलोचना निखारे,  पालक

पाल्यांचे भविष्य सोबतच त्यांच्या आरोग्याची चिंता असणे ही स्वाभाविक बाब आहे. केंद्र असलेल्या ठिकाणी योग्य व्यवस्था असणे गरजेचे आहे.- कविता दलाल पालक

बारावीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना काय वाटते?

परीक्षा, विद्यार्थी दशेतील अतिशय महत्वाची बाब आहे. पालकंसह पाल्यांच्या मनातील भिती दूर होणे महत्वाचे आहे. त्याबाबत जागृती करावी.- डॉ. गोपाल व्यास,  पालक

पालकांमध्ये  चिंतेचे वातावरण  आहे. येणारी वेळ कशी राहील, हे सांगता येत नाही. कॅरियरसोबत विद्यार्थ्यांचे आरोग्य जपावे लागणार आहे. -डॉ.विरेंद्र कुकडे ,  पालक

ऑनलाइन पेपर नकोच. पाल्याने वर्षभरातीलअभ्यासाचे फलीत व्हायला हवे. कोरोनाची भिती न बाळगता नियमांचे पालन करीत परीक्षा व्हाव्यात.- वैशाली कटकवार पालक

 

टॅग्स :examपरीक्षाEducationशिक्षण