शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

तहसील कार्यालय रामभरोसे

By admin | Updated: February 24, 2016 00:41 IST

१ लाख ५४ हजार लोकसंख्या असलेली पवनी तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रामभरोसे आहे.

रिक्त पदांचा फटका : नागरिकांची पायपीट, आल्यापावली परतण्याची वेळपवनी : १ लाख ५४ हजार लोकसंख्या असलेली पवनी तहसील कार्यालय कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे रामभरोसे आहे.यामुळे नागरिकांची कामे खोळंबली आहेत. अनेक प्रकरणे निकालाच्या प्रतिक्षेत आहेत. येथील तहसीलदाराचा कारभार नायब तहसीलदार तर नायब तहसीलदाराचा कारभार अव्वल कारकून सांभाळीत आहेत. येथे कुणीही जबाबदार अधिकारी नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पवनी तालुका हा गौण खनीज संपत्तीने भरलेला आहे. या तालुक्यात आठ रेतीघाट, मुरुम, दगड अशा अनेक गौण खनिजाच्या खाणी आहेत. मात्र गौण खनिजाचे रक्षण करणारे महसूल विभागाचे कर्मचारी अल्प प्रमाणात आहेत. रात्रभर जीव मुठीत घेऊन गौण खनिजांचे रक्षण करणे व दिवसभर जनतेचे कामे करणे हे नित्यक्रम ठरले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना कामाच्या अतितानामुळे आरोग्यावर विपरित परिणाम जाणवत आहे. या तालुक्यात ७८ ग्रामपंचायतींचा समावेश असून १५७ गावे व १ लाख ५४ हजार लोकसंख्या आहे. सहा महिण्यापूर्वी तहसीलदार नरेंद्र राचलवार सेवानिवृत्त झाले. तेव्हापासून येथील कारभार नायब तहसीलदार महेंद्र वाकलेकर हे प्रभारी म्हणून काम सांभाळीत आहेत. तर येथील अव्वल कारकून चरणदास शेंडे हे प्रभारी नायब तहसीलदारांचा कारभार सांभाळीत आहेत. प्रभारी तहसीलदार कोणत्या ना कोणत्या कामामुळे बाहेर राहत असल्यामुळे कार्यालयात उपस्थित राहत नाही. कर्मचाऱ्यांना रिक्त जागामुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढलेला आहे. परिणामी अनेक कर्मचारी मेडीकलच्या सुट्या काढीत आहेत. तर अनेक बदलीच्या मागे लागले आहेत. येथील तहसीलदार कर्मचाऱ्यांना कामावर कमी व गौण संपत्तीचे रक्षण करायला पाठवितात. त्यामुळे जनतेचे कामे खोळंबली आहेत. अजूनपर्यंत रेतीघाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना गौण खनिजाचे रक्षण करताना दमछाक करावी लागते आहे. (शहर प्रतिनिधी)