शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक हा समुपदेशक असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2015 00:25 IST

आजचा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शिकत आहे. मात्र त्या शिक्षणाचा आपल्या जीवनात खरच उपयोग होणार आहे काय?

प्रबोध येळणे यांचे प्रतिपादन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शनभंडारा : आजचा विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी शिकत आहे. मात्र त्या शिक्षणाचा आपल्या जीवनात खरच उपयोग होणार आहे काय? शिक्षणातून सुखी जीवन प्राप्त करता येईल काय? हा विचार सोडून विद्यार्थी फक्त शिक्षण घेत आहे. रट्टा मारून प्रथमही येईल, परंतु यथार्थ शिक्षण प्राप्त केल्यास त्यातून बोधही मिळेल व सुखी जीवन जगण्याचा मार्गही. यासाठी शिक्षकाने समुपदेशकाची भूमिका वटविणे काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रबोध येळणे (नागपूर) यांनी केले.येथील गणित विषयाचे प्राध्यापक सचिन जयस्वाल व त्यांच्या चमूने विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क आयोजित केलेल्या ''स्पिरीट्युआॅलिटी व सक्सेस'' या विषयावर आधारित कार्यशाळेत डॉ. येळणे बोलत होते. यावेळी मंचावर प्रा.सचिन जयस्वाल, डॉ. अरूंधती, प्रा. प्रमोद तिडके आदी उपस्थित होते. डॉ. येळणे म्हणाले, कुठलाही विद्यार्थी मानसीकरित्या खचला न पाहिजे याची विशेष जबाबदारी शिक्षकांसह पालकांनी घेणे गरजेचे आहे. पिढी साक्षर झाली म्हणजे समाजातील गुन्हेगारी कमी होईल, तणाव कमी होईल, असे सर्वेक्षणाअंती वाटत होते. परंतु आजची स्थिती बघता साक्षरता वाढली असली तरी समाजातून तणाव कमी झालेला दिसून येत नाही. कुटुंबातील सौहार्द, एकोपा, प्रेम कमी होत चालले आहे. शिक्षकही शिकविण्यात व्यस्त आहे, मात्र स्वत: शिकण्याकडे वेळ नाही. शिक्षण क्षेत्रात 'वर्क ईज वर्शिप' झाले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समाजात सुधारणा होवू शकते. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी 'डबल बेस्ट' चा सल्ला दिला. यात 'ब्रेथवेल, बाथवेल, ईटवेल, एक्सरसाईज वेल, स्लीप वेल, स्टडी वेल, टाईमवेल व टेकनिक्स वेल'चे सुत्र सांगितले. प्रास्ताविक सचिन जयस्वाल यांनी तर संचालन सनोवर खान, राज कटकवार, सरगम ठाकरे व जुही क्षीरसागर यांनी केले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने विद्यार्थी तथा पालकगण उपस्थित होते. (प्रतिनिधी)