शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या योजनांचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2016 00:43 IST

पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी वयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत.

एल.पी. देशमुख यांचे आवाहन : खुटसावरी येथे पशुचिकित्सा शिबिरभंडारा : पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालकांसाठी वयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविल्या जात आहेत. गोपालकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनामार्फत विविध योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. या योजनांचा पशुपालकांनी लाभ घेवून आपला आर्थिक दर्जा वाढवावा, असे आवाहन खुटसावरी येथील पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एम.पी. देशमुख यांनी केले.महाराजस्व अभियान अंतर्गत राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१ खुटसावरी येथे पशुचिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी गोपालकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.के. वाढई, सहायक पशुधन विकास अधिकारी पगारे, पशुधन पर्यवेक्षक दुर्गे, भडके, चामलाटे, पशुसंवर्धन विभाग साकोलीचे सहायक आयुक्त डॉ. वाय.एस. वंजारी, पशुधन विकास अधिकारी डॉ. वैद्य आदी उपस्थित होते. यावेळी गोपालकांना पशुसेवा पुरविण्यात आली. एकूण २३० जनावरांची तपासणी करण्यात आली. यात ८० जंत निर्मूलन, ६० गोचिड निर्मूलन, २० वंधत्व तपासणी, २० गर्भतपासणी, दोन कृत्रिम रेतन, १० खच्चीकरण, ३८ जनावरांवर उपचार करण्यात आले. यावेळी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने माहितीपत्रक वितरीत करण्यात आले व पशुपालकांना माहिती देण्यात आली. आयोजित कार्यक्रमात पशुसंवर्धन विभागाच्या वतीने स्टॉल लावण्यात आले. स्टॉलमध्ये कामधेनू दत्तक ग्राम योजनेचे माहितीपत्रक, अझोला शेवाळवर्गीय वनस्पतीचे जनावरांच्या आहारात महत्व, निकृष्ठ चाऱ्यावर युरिया प्रक्रिया करून सकस आहारात रूपांतर करणे, विविध चारा पिके लागवड बरसीम, मका, ज्वारीची आहारात महत्व, गुढ उत्पादनात दशसुत्री, पशुधन विमा योजनेची माहिती देण्यात आली. शिबिराचे प्रास्ताविक पशुधन विकास अधिकारी डॉ. एल.पी. देशमुख यांनी केले. संचालन पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.के. वाढई तर आभार प्रदर्शन परिचर माणिक चौधरी यांनी केले. शिबिरासाठी पशुधन पर्यवेक्षक दुर्गे, भडगे, चामलाटे, माणिक चौधरी, भोयर, डडमल यांनी सहकार्य केले. शिबिराला मोठ्या प्रमाणात गोपालकांनी हजेरी लावली होती. (नगर प्रतिनिधी)