शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीत राहून खाजगी दवाखाने चालविणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: February 22, 2016 01:01 IST

शासकीय सेवेत असणाऱ्या डॉक्टरांना खाजगी दवाखाना टाकू नये यासाठी मूळ वेतनाच्या ३० टक्के भत्ता देण्यात येतो.

पटोले यांचे निर्देश : दक्षता सनियंत्रण समितीची बैठकभंडारा : शासकीय सेवेत असणाऱ्या  डॉक्टरांना  खाजगी दवाखाना टाकू नये यासाठी मूळ वेतनाच्या ३० टक्के भत्ता देण्यात येतो. मात्र तरीही सार्वजानिक आरोग्य सेवेतील डॉक्टर रूग्णांना योग्य सेवा न देता खाजगी दवाखाने उघडून बसतात.  अशा खाजगी दवाखाने  चालविणाऱ्या  डॉक्टरांविरुद्ध कायदेशीर करवाई करण्याच्या  सूचना खा. नाना पटोले यांनी दिले आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्हा दक्षता व सनियंत्रण समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष  भाग्यश्री गिलोरकर,  जिल्हाधिकारी धीरजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर,  पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.ग्रामीण  भागातील  नागरिकांना ग्रामीण  रूग्णालयांमध्ये  चांगल्या सुविधा  मिळण्यासाठी शासन अनेक उपाय योजना राबवित आहे. मात्र तरीही  ग्रामीण भागात  चांगल्या सेवा मिळत नाहीत, अशी तक्रार लोकप्रतिनिधींकडून करण्यात आली.  नागरिकांनी सार्वजनिक रूग्णालयातील कोणत्याही तक्रारीसाठी १०४ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी. तसेच गर्भवती आणि बालकांना उपचारासाठी  रूग्णालयात ने-आण करण्यासाठी १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन करुन रुग्णवाहिका मागवू शकता, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेन्द्र पातुरकर यांनी यावेळी सांगितले. सध्या आयुर्वेदिक उपचार  पद्धतीला  मोठी मागणी आहे. याचा भविष्यातील विचार करता आपल्याकडील जंगल, आणि पर्यटनाच्या  दृष्टिकोनातून  भंडारा येथे आयुष दवाखान्यासाठी प्रस्ताव तयार करुन केंद्र शासनाकडे पाठवावा. यासाठी आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे खा. पटोले यानी यावेळी सांगितले. मिशन इंद्रधनुष अंतर्गत ८९ बालकांना लसीकरण करण्यात आले. जननी सुरक्षा योजनेमध्ये रुग्णालयात प्रसूतीचे प्रमाण ९९.६४ टक्के आहे, अशी माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पातुरकर यांनी यावेळी दिली. (नगर प्रतिनिधी)