त्या वीज अभियंत्यावर कारवाई करा, अन्यथा उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:24 AM2021-06-20T04:24:01+5:302021-06-20T04:24:01+5:30

वीज वितरण केंद्र वडद अंतर्गत असलेल्या महालगाव येथील गट क्रमांक ४८४/१ येथे बोअरवेल नसताना अर्थकारण करून ५ जानेवारी २०१८ ...

Take action against that electrical engineer, otherwise fast | त्या वीज अभियंत्यावर कारवाई करा, अन्यथा उपोषण

त्या वीज अभियंत्यावर कारवाई करा, अन्यथा उपोषण

Next

वीज वितरण केंद्र वडद अंतर्गत असलेल्या महालगाव येथील गट क्रमांक ४८४/१ येथे बोअरवेल नसताना अर्थकारण करून ५ जानेवारी २०१८ ला वीज जोडणी देण्यात आली. सदर प्रस्तावास मजुरी प्रदान करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. पण सहाय्यक अभियंता वीज वितरण कंपनी यांचे पत्रानुसार वीज जोडणी अर्ज नामंजूर केला असताना गट क्रमांक ४८४/१ मध्ये कृषी पंप करिता ३ एचपी नवीन वीज जोडणी देण्यासाठी मे २०२१ मध्ये १ किमी अंतरापासून पोल गाडणे व वायरिंग करणे. तथा जून २०२१ मध्ये डीपी बसविणे. असा गैरप्रकार करण्यात आलेला आहे. तसेच मौजा आलेबेदर, पिटेझरी, उमरझरी, चांदोरी, सानगडी सर्कलसह वनव्याप्त भागात जिल्हाधिकारी भंडारा यांचेकडून वनसंज्ञा आदेश असलेल्या वन जमिनीवरील अतिक्रमण धारकांचे नावाने सात बारासारखे मालकीयत प्रमाणपत्र नसताना या परिसरतील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी अधिकाराचा दुरुपयोग करून आर्थिक देवाणघेवाणीतून वीज जोडणी दिली असल्याचे निवेदनात नमूद आहे. या प्रकाराने वीज वितरण कंपनीचे कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले असून पात्र लाभार्थ्यांवर अन्याय झाला आहे. नियमबाह्य कामे करणाऱ्या कनिष्ठ अभियंत्यांची जबाबदारी मुकरर करून शासनाचे प्रचलित कायद्याप्रमाणे निलंबनाची कारवाई करावी. तथा झालेली नुकसान त्यांचेकडून वसूल करावी. या मागण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे वतीने उपकार्यकारी अभियंता वीज वितरण कंपनी साकोली यांना निवेदन देण्यात आले आहे. मागण्याची पूर्तता न केल्यास वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर १ जुलैपासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर कैलास गेडाम, हरिभाऊ खोटेले, अरविंद कठाणे, सुरेश मेश्राम, नितीन इलमकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Take action against that electrical engineer, otherwise fast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.