शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

साकोली नगरपंचायत निवडणुकीला स्थगिती

By admin | Updated: October 8, 2015 00:22 IST

राज्य शासनाने जाहीर केलेल्या साकोली नगर पंचायतीच्या निवडणुकीला आज बुधवारला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायाधीश भूषण गवई ...

उच्च न्यायालयाचा आदेश : दोन आठवड्याची प्रतीक्षासंजय साठवणे  साकोली राज्य शासनाने जाहीर केलेल्या साकोली नगर पंचायतीच्या निवडणुकीला आज बुधवारला उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश वऱ्हाडे यांच्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे साकोली नगर पंचायत निवडणुकीची प्रक्रिया आता थांबणार आहे. साकोलीत नगर पंचायत निवडणूक रद्द करुन नगर परिषद व्हावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रेवाराम उर्फ मदन रामटेके यांनी जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने बुधवारला ४ वाजता साकोली नगर पंचायतच्या प्रस्तावित निवडणुकीला अंतरिम स्थगिती दिली आहे. शासनाने महाराष्ट्रातील १३९ तालुकास्तरावरच्या ग्रामपंचायतचे रुपांतर नगरपंचायतीत केले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ६८ नगर पंचायतीच्या निवडणुका घोषित करण्यात आल्या होत्या. यात १ नोव्हेंबर रोजी मतदान होणार होते. या निवडणुकीत साकोली नगर पंचायतचा समावेश होता. दोन महिन्यापूर्वी साकोली नगर पंचायतचे रुपांतर नगर परिषदेत व्हावे यासाठी साकोलीचे आमदार बाळा काशिवार यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्यपाल विद्यासागर राव यांनी दि. ३ सप्टेंबर रोजी साकोली नगर परिषदेची उद्घोषणा केली होती. त्यावर आक्षेपासाठी एक महिन्याचा कालावधी दिला होता. मात्र याच दरम्यान शासनाने साकोली नगर पंचायत निवडणुकीची घोषणा केली. त्यामुळे लोकप्रतिनिधी व साकोली, सेंदूरवाफा येथील नागरिक संभ्रमात होते.नगर परिषदेची उद्घोषणा जाहीर झाल्यामुळे भविष्यात नगर पंचायत स्थगित होऊन पुन्हा नगर परिषदेची प्रक्रिया लागू शकते, यात शासनाच्या व लोकांचा पैसा खर्च होऊ शकतो. यासाठी ही प्रक्रिया थांबविण्यात यावी, यासाठी माजी सभापती मदन रामटेके यांनी दि. ६ सप्टेंबर रोजी नागपूर खंडपीठात जनहीत याचिका दाखल केली. आज या निवडणुकीला उच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली. या प्रकरणात याचिकाकर्ता रामटेके यांच्यावतीने अ‍ॅड.शशीकांत बोरकर, अ‍ॅड.दिलीप कातोरे यांनी बाजू मांडली तर शासनातर्फे अ‍ॅड.दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली आहे. या आदेशामुळे नगर पंचायत निवडणूक लढू पाहणाऱ्या इच्छूकांचा हिरमोड झाला आहे.