शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालयाला औषधांचा पुरवठा

By admin | Updated: October 12, 2015 01:13 IST

धान पिकावरील किडींचा नायनाट करणाऱ्या उपाययोजनांचे संदेश शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर येत असताना प्रत्यक्षात कृषी विभागात औषध उपलब्ध केले जात नाही.

चुल्हाड (सिहोरा) : धान पिकावरील किडींचा नायनाट करणाऱ्या उपाययोजनांचे संदेश शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर येत असताना प्रत्यक्षात कृषी विभागात औषध उपलब्ध केले जात नाही. या आशयाचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित होताच सिहोऱ्यांच्या मंडळ कृषी कार्यालयात औषधांचा पुरवठा करण्यात आलेला आहे.वैनगंगा आणि बावनथडी नद्यांच्या खोऱ्यात असलेल्या सिहोरा परिसरात खरीप व रबी हंगामात धानाचे प्रमुख पीक घेतले जात आहे. या शिवाय नदी काठालगत शेतकरी भाजीपाला उत्पादन घेण्याकडे भर देत आहे. या शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, मार्गदर्शन करण्यासाठी स्वतंत्र मंडळ कृषी कार्यालय आहे. परंतु हा कार्यालय अद्याप हायटेक करण्यात आलेला नाही. पाणलोट तथा अन्य शेतीपयोगी कामे व मार्गदर्शनाची जबाबदारी असताना मनुष्यबळाचा अभाव या कार्यालयाला अडचणीचे ठरत आहे. ७३ गावांची धुरा सांभाळणाऱ्या सिहोऱ्यातील मंडळ कृषी कार्यालयाने गेल्या महिनाभरात स्थानांतरणावरून कटुसत्य अनुभवले आहे. दरम्यान्, शेतकऱ्यांचे भ्रमणध्वनीवर पाऊस, संपर्क तथा धान आणि भाजीपाला लागवडीवर लागणाऱ्या किडींचा नायनाट करण्यासाठी उपायांचे संदेश दिले जात आहेत. नानाविध फॉम्युर्ले सांगितली जात असताना हक्काच्या मंडळ कृषी कार्यालयात औषधांचा पुरवठा करण्यात येत नाही. यामुळे शेतकरी सैरवैर औषधांच्या शोधासाठी खासगी कृषी केंद्रावर धाव घेत आहे. यात शेतकरी भरडल्या जात असताना लोकप्रतिनिधी दातखिळी बसली असल्याचा अनुभव शेतकरी घेत आहेत.शेतकऱ्यांचे हिताचे निर्णय घेणारे दोन विभाग असताना शेतकरी नागवला जात आहे. विकासावर योजनांचा पाऊस पडत नाही. तर योजना दारात पोहचत नाही. अनेक योजना आपुलकीच्या नादात 'लंब्या' होत आहेत. ही बाब आणि शेतकऱ्यांची कैफीयत लोकमतने वृत्तात मांडली आहे. या वृताची दखल घेत सिहोऱ्यांच्या मंडळ कृषी कार्यालयात क्लीनीलफास, क्लोरोपायरीफास, कार्बोन्डाइझेस या औषधांचा प्रात्यक्षिकेसाठी पुरवठा करण्यात आलेला आहे. या औषधी शेतकऱ्यांना वाटप सुरु झाले असून सिहोरा परिसरात शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. (वार्ताहर)