शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
3
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
4
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
5
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
6
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
7
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
8
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
9
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
10
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
11
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
12
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
13
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
14
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
15
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
16
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
17
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
18
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
19
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
20
“देशातील तरुणांचा मला अभिमान, माझ्या विधानाचा विपर्यास केला”; CJI सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड दूर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक शरद भेलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पशुवैद्यकीय सहाय्यक उपसंचालक डॉ.कृपाचार्य बोरकर, प्राचार्य हेमंत केळवदे, नगरसेवक सचिन बोपचे उपस्थित होते. नगराध्यक्ष प्रदीप पडोळे पुढे म्हणाले, तीनही शाखा सारख्याच असून कठीण परिश्रमाने सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेत दाखल होत आहेत.

ठळक मुद्देप्रदीप पडोळे : तुमसर येथील जनता कनिष्ठ महाविद्यालयाचे स्रेहसंमेलन

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : स्पर्धेच्या युगात सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. परिश्रम, जिद्दीच्या भरवशावर अनेक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय नोकऱ्या प्राप्त केल्या. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही कुठेही कमी नाही. मनातील न्यूनगंड दूर सारुन अभ्यासाला लागा, असा सल्ला नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी दिला.
जनता कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पर्यवेक्षक शरद भेलकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून पशुवैद्यकीय सहाय्यक उपसंचालक डॉ.कृपाचार्य बोरकर, प्राचार्य हेमंत केळवदे, नगरसेवक सचिन बोपचे उपस्थित होते.
नगराध्यक्ष प्रदीप पडोळे पुढे म्हणाले, तीनही शाखा सारख्याच असून कठीण परिश्रमाने सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रशासकीय सेवेत दाखल होत आहेत. आर्थिक स्थिती हलाखीची असताना मी अभियंता झालो. शिक्षणाकरिता गरीबी कधीही आड येत नाही. केवळ ध्येय निश्चित करण्याची गरज आाहे.
याप्रसंगी नगरसेवक सचिन बोपचे, प्राचार्य हेमंत केळवदे, डॉ.कृपाचार्य बोरकर,पर्यवेक्षक शरद भेलकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेचे पूजन करून संस्थेचे संस्थापक स्व.श्यामसुंदर बोरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आले. तीन दिवसीय स्नेहसंमेलनात शेतकऱ्यांची आत्महत्या, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, बेटी बचाओ-बेटी पढाव, पर्यावरण रक्षण, आदिवासींची संस्कृती इत्यादीवर विद्यार्थ्यांनी नाटीका सादर केल्या.
स्वयंस्फूर्त भाषण, वादविवाद स्पर्धा, एकलनृत्य, समूहनृत्य, गीत गायन, अनोखी महफील, मुकनाट्य, बचाव स्पर्धा इत्यादी कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. संचालन प्रा.शशीकला पटले,प्रा.एन.टी. कापगते, अतिथींचा परिचय प्रा.मोहन भोयर,प्रास्ताविक प्रा.विद्यानंद भगत, आभार प्रा.आशिष खोब्रागडे यांनी मानल्या.
स्नेहसंमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्रा.नितीन पाटील, प्रा.गणेश चाचिरे, प्रा.सविता बोरकर, धर्मेंद्र कोचे तथा विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

टॅग्स :Studentविद्यार्थी