शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

पिंडकेपार येथे विद्यार्थ्यांना मिळाली हक्काची शाळा

By admin | Updated: April 25, 2017 00:19 IST

गाव म्हटले की येथील विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शाळांची निर्मिती करण्यात आली आहे.

जया सोनकुसरे यांचा पुढाकार : दीड वर्षांपासून झाडाखाली भरत होती शाळाभंडारा : गाव म्हटले की येथील विद्यार्थ्यांना हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी शाळांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र भंडारा येथील ३ किमी अंतरावरील पिंडकेपार येथे शाळेची इमारत नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांना झाडाखाली बसून विद्यार्जन घ्यावे लागत होते. ही परिस्थिती बघून जि.प. सदस्य जया सोनकुसरे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे येथे शाळेची इमारत दुरुस्ती करण्यात आली आहे. यासोबतच हीच शाळा डिजीटल करुन विद्यार्थ्यांसाठी हक्काची शाळा दिली आहे. पिंडकेपार हे गाव गोसे प्रकल्पबाधीत ३४ गावांपैकी एक आहे. येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे मिळावे यासाठी जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र ती पुर्णपणे मोडकडीस आली असल्याने येथे बसून शिक्षण घेणे विद्यार्थ्यांचा जीवाला धोका पोहचण्याचा प्रसंग उद्भवू शकत असल्याची विदारक स्थिती होती. त्यामुळे येथील मुख्याध्यापक श्रावण हजारे यांनी विद्यार्थ्यांप्रती जिव्हाळा दाखवून गावातील समाज मंदिराची दुरुस्ती तिथे विद्यार्थ्यांना शिकवित होते. वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना झाडाच्या सावलीत बसवून शिकविण्याचा प्रसंगही येथील शिक्षकांनी अनुभवला. येथील जिर्णावस्थेतील इमारत पाडून नविन इमारत बांधकाम करण्यासाठी परवानगी द्यावी किंवा दुरुस्ती खर्च द्यावा अशी मागणी सोनकुसरे यांनी जिल्हा परिषद शिक्षण सभापतींकडे लावली होती. यात विशेष शाळा दुरुस्तीकरिता विशेष निधी देण्यात आला. या निधीतून शाळा दुरुस्ती करण्यात आली. सोबतच डिजीटल शाळाही बनवून विद्यार्थ्यांच्या हक्काची शाळा त्यांना देण्यात आली. त्या डिजीटल वर्ग खोलीचे उद्घाटन जि. प. सदस्य जया सोनकुसरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पं.स.उपसभापती ललीत बोंद्रे, पं.स.सदस्य वर्षा साकुरे, सरपंच प्रशांत रामटेके, मुख्या. श्रावण हजारे, उपसरपंच यशवंत सोनकुसरे, उप सरपंच मडावी, ग्रा.पं. सदस्य देवनाथ रामटेके, बडवाईक, आतीलकर, क्रिष्णा आतीलकर, गोवर्धन साकुरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)शिक्षण विभागाला दिला गर्भित इशाराशाळेची दयनिय अवस्था बघुन जिल्हा परिषद सदस्य जया सोनकुसरे यांनी शाळेला हक्काची इमारत मिळावी यासाठी जिल्हा परिषद सभागृहात विषय लावून धरला. शिक्षण विभागाने शाळा इमारत द्यावी अशी मागणी रेटून लावली. इमारत न दिल्यास वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना शिक्षण विभागातच आणून इथेच वर्ग घेण्याचा इशारा दिला होता. यामुळे शिक्षण विभागाने पिंडकेपार येथे तातडीने एक वर्गखोली मंजूर करुन ती बांधली.