शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षिकेच्या मारहाणीत विद्यार्थ्याचा डोळा निकामी

By admin | Updated: April 25, 2017 00:14 IST

कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या पाच वर्षीय बालकाला शिक्षिकेने पेन फेकून मारली. ही पेन उजव्या डोळ्याला लागल्याने ....

जांब येथील कॉन्व्हेंटमधील प्रकार : गुन्हा नोंदविण्यास पोलिसांची हयगय भंडारा : कॉन्व्हेंटमध्ये शिकणाऱ्या पाच वर्षीय बालकाला शिक्षिकेने पेन फेकून मारली. ही पेन उजव्या डोळ्याला लागल्याने तो निकामी झाल्याची घटना मोहाडी तालुक्यातील जांब येथील सेंट जॉन कॉन्व्हेंटमध्ये घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा न नोंदविता आरोपीला अभय दिल्याचा आरोप पालकांनी केला आहे.ओम बादल श्रीपात्रे असे जखमी बालकाचे नाव आहे. ही घटना ७ एप्रिलला सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास घडल्याची जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनात पालकांनी म्हटले आहे. बादल श्रीपात्रे यांचा ओम हा पाच वर्षीय मुलगा नित्याप्रमाणे ७ एप्रिलला शाळेत गेला होता. शाळा सुटल्यानंतर ओमची आई रजनी ही त्याला घ्यायला शाळेत गेली होती. यावेळी त्याच्या उजव्या डोळ्याला जखमी दिसून आल्याने तिने शिक्षिका शीतल जावळकर यांना विचारणा केली. यावर तिने उडवाउडवीचे उत्तर दिल्याचा आरोप रजनी श्रीपात्रे यांनी केला आहे. डोळ्याची दुखापत असल्याने पालकांनी ओमला तातडीने शीतल जावळकर व तिच्या पतीसह भंडाऱ्याला आणले. येथील डॉक्टरांनी त्याला नागपुरला उपचारासाठी नेल्याचा सल्ला दिला. यावेळी शीतल जावळकरचे पती हे स्वत: विद्यार्थ्यांच्या पालकांसोबत नागपुरला गेले. तिथे महात्म्ये रुग्णालयात ओमच्या डोळ्याची तपासणी केली असता तेथील डॉक्टरांनी डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून शस्त्रक्रिया करावी लागेल व याकरिता एक ते दीड लाख रुपयांचा खर्च येणार असल्याचे सांगितले. यानंतर शिक्षिका जावळकर यांचे पती यांनी नागपूर येथे ओम व त्याच्या पालकांना सोडून गाव गाठले व त्यानंतर त्यांनी याप्रकरणात कुठलीही मदत करण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी ओमच्या पालकांनी आंधळगाव पोलिसात शिक्षिका शीतल जावळकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय दिल्याचा आरोप ओमचे आईवडील बादल व रजनी श्रीपात्रे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे. (शहर प्रतिनिधी)वर्गात विद्यार्थी नेहमी मस्ती करीत असतात. त्यात त्याच्या डोळ्याला दुखापत झाली असावी. त्याच्या दुखापतीबाबत मला माहिती नाही व मी पेन फेकूनही मारलेली नाही. - शीतल जावळकर, शिक्षिका.विद्यार्थ्याला पालकांनी खासगी रुग्णालयात औषधोपचाराकरिता नेले. त्याचे कागदपत्र मागवून जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याची तपासणी करण्यात येईल. यात जिल्हा शल्य चिकित्सकांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर शिक्षिका दोषी असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.- के.बी. उईके, ठाणेदार आंधळगाव.सीबीएससी कॉन्व्हेंटच्या नावावर गरीब पालकांची लुबाडणूक करण्यात येते. शैक्षणिक अहर्ता नसलेल्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येते. मुळात अशा शाळांची तपासणी करून त्यांच्या मान्यतेबाबत शहानिशा करणे गरजेचे आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या शिक्षिकेवर कारवाई करणे गरजेचे आहे.- किरण अतकरी, माजी जि.प. सदस्य.