शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

साकोलीला वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 6:00 AM

सोमवारी सायंकाळी अचानक साकोली शहरासह तालुक्यात वादळी पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजता पावसासोबत बोराच्या आकाराचा गारांचा वर्षाव झाला. वादळात ग्रामीण भागातील अनेक घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. तर साकोली येथील शामराव बापु कापगते महाविद्यालयावरील टिनाचे शेड उडून गेले. सुदैवाने यावेळी महाविद्यालयात कुणीही उपस्थित नव्हते.

ठळक मुद्देरबी पिकाचे नुकसान : वादळात महाविद्यालयाचे छत उडाले, शेतकरी धास्तावले

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : वादळी पावसासह गारपिटीचा साकोली तालुक्याला सोमवारी सायंकाळी जोरदार तडाखा बसला. वादळाने अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली. तर गारपिटीने गहू, हरभरासह उन्हाळी धानपिकाचे नुकसान झाले.सोमवारी सायंकाळी अचानक साकोली शहरासह तालुक्यात वादळी पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ६ वाजता पावसासोबत बोराच्या आकाराचा गारांचा वर्षाव झाला. वादळात ग्रामीण भागातील अनेक घरावरील टिनपत्रे उडाली आहेत. तर साकोली येथील शामराव बापु कापगते महाविद्यालयावरील टिनाचे शेड उडून गेले. सुदैवाने यावेळी महाविद्यालयात कुणीही उपस्थित नव्हते. साकोलीतील फुटपाथवर असलेल्या दुकानदारांचे पाल या वादळात उडून गेले. गारपिटीचा तडाखा तालुक्यातील सेंदुरवाफा, परसोडी, लवारी, उमरी, कुंभली, धर्मापूरी आदी गावांना बसला. बोराच्या आकाराचा या गारांमुळे गहू, हरभरा, उन्हाळी धान व भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान मंगळवारी पुन्हा सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली.जिल्ह्यात अवकाळी पाऊसभंडारा : मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी आदी तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. मोहाडी तालुक्यातील लोहारा व जांब परिसरात सोमवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिघोरी मोठी येथे रिमझिम पाऊस बरसला. भंडारा शहरातही पावसाची सर कोसळली.उघड्यावरील धान ओलाधान निघाला तेव्हापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. अनेक शेतकऱ्यांचा धान आजही आधारभूत केंद्रावर उघड्यावर आहे. अवकाळी पावसाने अनेक केंद्रावरील धान ओला झाला. ढगाळ वातावरण निर्माण होताच धान झाकण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ दिसत होती.जिल्ह्यात ६.५ मिमी पावसाची नोंदजिल्ह्यात ६.५ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. सर्वाधिक पाऊस साकोली आणि भंडारा तालुक्यात नोंदविण्यात आला. भंडारा येथे ४.५ मिमी तर साकोली येथे ४.६ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. पवनी तालुक्यात २.२ मिमी तर मोहाडी तालुक्यात ०.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. सर्वाधिक पाऊस एकोडी कृषी मंडळात नोंदविण्यात आला. येथे ११.६ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.

टॅग्स :Rainपाऊस