शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
6
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
7
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
8
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
9
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
10
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
11
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
12
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
13
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
14
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
15
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
16
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
17
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
18
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
19
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
20
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडणे बंद

By admin | Updated: July 16, 2014 00:00 IST

काटेबाम्हणी शिवारात पाच शेतकऱ्यांनी बावनथडी प्रकल्पाचा लघु कालवा क्रमांक पाच फोडला होता. त्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्य प्रकल्पातून पाणी देणे सोडणे तात्काळ बंद केल्याची माहिती आहे.

कर्तव्यात कसूर : पावसाचे कारण केले पुढे
तुमसर : काटेबाम्हणी शिवारात पाच शेतकऱ्यांनी बावनथडी प्रकल्पाचा लघु कालवा क्रमांक पाच फोडला होता. त्यानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी मुख्य प्रकल्पातून पाणी देणे सोडणे तात्काळ बंद केल्याची माहिती आहे. येथे केवळ लघु कालवा फोडलेल्या कालव्यातून पाणी देणे बंद करण्याची गरज होती. दुपारनंतर पाऊस आल्यामुळे तसा निर्णय घेतल्याचे कळते, परंतु येथे मुख्य कारण दुसरेच असल्याची माहिती आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची धान पऱ्हे वाळू लागले होते. पऱ्हे वाचविण्याकरिता बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले होते. खापाजवळ तुमसर-रामटेक राज्य महामार्गाशेजारी काटेबाम्हणी शिवारात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊराव तुमसरे व इतर चार शेतकऱ्यांनी बावनथडी प्रकल्पाचा लघु कालवा क्रमांक पाच फोडून आपल्या शेतात ते पाणी वळते केले. याप्रकरणी उपविभागीय अभियंता निशिकांत पनके यांनी तुमसर पोलीस ठत्तण्यात त्यांच्या विरोधात दि.१२ जुलै रोजी तक्रार नोंदविली होती.
दि.१४ जुलै रोजी वरिष्ठ प्रकल्प अधिकाऱ्यांनी सकाळी सितेकसा येथील बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडणे बंद केले. यासंदर्भात उपविभागीय अभियंता निशिकांत पनके यांना विचारले असता मला माहिती नाही, असे सांगून पावसाला सुरूवात झाल्याने पाणी सोडणे बंद करण्यात आले असेल असे सांगितले. पाणी सोडणे व बंद करणे याचा निर्णय प्रकल्पाचे कायृकारी अभियंता घेतात, असे सांगितले. येथे जर तर चे उत्तर अभियंता पनके यांनी दिले. प्रकल्पातून पाणी सोडणे बंद केल्याने शेतकऱ्यांत तीव्र रोष असून दि.१४ जुलैचा पाऊस सर्वत्र नाही, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या.(तालुका प्रतिनिधी)