शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

शहर काँग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

०२ लोक ०१ के मोहाडी : नळ सोडण्याच्या वेळी वीज पुरवठा बंद करावा, सूर नदीत पेंच धरणाचे पाणी सोडण्यासाठी ...

०२ लोक ०१ के

मोहाडी : नळ सोडण्याच्या वेळी वीज पुरवठा बंद करावा, सूर नदीत पेंच धरणाचे पाणी सोडण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करावे, अडकलेला घरकुल निधी त्वरित देण्यात यावा, मोहाडी शहराच्या आतील रस्त्यावरून होणाऱ्या रेतीच्या जड वाहतुकीला आळा घालावा, इत्यादी मागण्यांचे निवेदन शहर काँग्रेस कमिटी, मोहाडीतर्फे नगर पंचायत मुख्याधिकारी यांना देण्यात आले.

सध्या सूर नदीत पाणी नसल्याने मोहाडी शहराला दोन दिवसाआड नळाचे पाणी सोडण्यात येत आहे. ज्यांच्याकडे टिल्लू पंप आहेत ते अधिकचे पाणी ओढून घेतात. त्यामुळे इतर लोकांना आवश्यक तेवढा पाणीसाठा मिळत नाही. त्यामुळे नळ सोडण्याच्या वेळी विद्युत पुरवठा बंद करण्यात आला तर सर्वांना सारखे पाणी मिळेल व पाण्याची टंचाई जाणवणार नाही. त्यासाठी विद्युत विभागाशी त्वरित संपर्क करून तोडगा काढण्यात यावा, येथील नळ योजनेचे पंप हाऊस सूर नदीवर असून, संपूर्ण नदी आटलेली असल्याने पाणीटंचाई दूर करण्यासाठी पेच धरणाचे पाणी नदीत सोडण्यासाठी उच्चस्तरीय प्रयत्न करण्यात यावे, अनेक घरकुल धारकांना केंद्र सरकारकडून मिळणारे दीड लाख रुपये मिळालेले नाहीत. त्यासाठी प्रयत्न करण्यात यावा. घरकुलधारकांना उरलेली रक्कम त्वरित देण्यात यावी, तसेच मोहाडी शहरातील आतील रस्त्यावरून रेतीची होणारी अवैध वाहतूक थांबविण्यात यावी, यामुळे शहरातील रस्ते खराब होणार नाहीत. इत्यादी मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या विषयावर चर्चा करण्यात आली असता, राज्य शासनाचे प्रतिघरकुल एक लाख रुपये प्राप्त झाले असून, ते वाटपसुद्धा करण्यात आले आहेत. परंतु केंद्र शासनाकडून मिळणारे एक लाख ५० हजार रुपये अप्राप्त आहेत. त्यासाठी ५ जानेवारी २०२१ ला व नंतर फेब्रुवारीला सुद्धा म्हाडाकडे रितसर निधीची मागणी केली आहे. सूर नदीत पेच धरणाचे पाणी आठ ते दहा दिवसात सोडण्यात येईल. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. सूर नदीवर पाणी अडविण्यासाठी कच्चा बांध तयार झालेला आहे, अशी माहिती मुख्याधिकारी रामेश्वर पांडागळे यांनी शिष्टमंडळाला दिली तसेच इतर मागण्यासुद्धा प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले. निवेदन देताना काँग्रेस शहर अध्यक्ष हरिराम निमकर, माजी नगराध्यक्ष गीता बोकडे, स्वाती निमजे, माजी उपाध्यक्ष सुनील गिरेपुंजे, राजन सिंगनजुडे, प्रदीप वाडीभस्मे, विजय बोकडे, सिराज शेख, मनोहर बोरघरे, रागिनी सेलोकर, शोभा बुरडे, अनंतराम मेश्राम, मंदा धकाते, वंदना मेश्राम इत्यादी उपस्थित होते.

शासनाकडे घरकुलाच्या उपलब्ध निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र सादर केलेले असून, उर्वरित केंद्र शासनाच्या निधीची मागणी केलेली आहे. केंद्र शासनाचा निधी उपलब्ध होताच घरकुलधारकांना उर्वरित निधी वाटप केला जाईल.

रामेश्वर पांडागळे, मुख्याधिकारी,

नगरपंचायत, मोहाडी.