लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व अहमदनगर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने पहिल्यांदाच घोषित करण्यात आलेला राज्यस्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार क्रीडा शिक्षक सुनील रामभाऊ खिलोटे यांना प्रदान करण्यात आला. खिलोटे हे भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात कार्यरत आहेत. त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.अहमदनगर जिल्ह्यातील आदर्श गाव असलेल्या हिरवे बाजार येथे सोमवारी झालेल्या दिमाखदार सोहळ्यात भारतीय फेन्सींग असोसिएशनचे कोषाध्यक्ष अशोक दुधारे, महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र कोतकर, कैलास जैन, अहमदनगर जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी, शिवदास ढवळे, विश्वनाथ पाटोळे, मयुर ठाकरे, नंदकुमार शितोडे, मधुसूदन पांडव, बंडू गिलोरकर, कल्पना पांडव, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा शिक्षक खिलोटे यांचा शाल व श्रीफळ व सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांची पत्नी भाग्यश्री खिलोटे, मुलगी कृषीका व मुलगा यश उपस्थित होते. खिलोटे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा क्रीडा कार्यालयासह शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. अशोकसिंह राजपूत, प्रा. प्र्रकाश सिंह, माजी प्राचार्य दत्तात्रय देशमुख, प्राचार्य जी. पी. लोंदासे, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तत्वराज अंबादे, राजेश गेडाम, धनंजय बिरणवार यासह जिल्ह्यातील शिक्षकवृंदानी त्यांचे कौतुक केले आहे.
सुनील खिलोटे यांना राज्यस्तरीय पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 21:35 IST
महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ व अहमदनगर जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाच्या वतीने पहिल्यांदाच घोषित करण्यात आलेला राज्यस्तरीय आदर्श क्रीडा पुरस्कार क्रीडा शिक्षक सुनील रामभाऊ खिलोटे यांना प्रदान करण्यात आला. खिलोटे हे भंडारा येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात कार्यरत आहेत. त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सुनील खिलोटे यांना राज्यस्तरीय पुरस्कार
ठळक मुद्देहिरवे बाजार येथे समारंभ : जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा