भरधाव एसटी बसची ट्रकला धडक; १५ जखमी, तीन गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 16:04 IST2021-03-24T16:01:20+5:302021-03-24T16:04:10+5:30
बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.

भरधाव एसटी बसची ट्रकला धडक; १५ जखमी, तीन गंभीर
भंडारा : शहापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर एसटी बस आणि ट्रचा मोठा अपघात झाला. या अपघातात १५ जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. सर्व जखमी प्रवाशांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (ST bus hits truck; 15 injured, three serious)
भंडारा तालुक्यातील शहापूरजवळ राष्ट्रीय महामार्गावर ओव्हरटेक करताना समोरील ट्रक अचानक थांबल्याने ही भरधाव एसटी बस ट्रकवर आदळली. बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.