शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

By admin | Updated: September 21, 2016 00:36 IST

शासन शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व्यापारी वृत्ती बाळगणे गरजेचे असून ...

बाळा काशीवार : शिवनीबांध येथे मत्सबीजांचे वाटपसाकोली : शासन शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात विविध योजना राबवित आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व्यापारी वृत्ती बाळगणे गरजेचे असून या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे संबंधित विभागाची जबाबादार असल्याचे प्रतिपादन आमदार बाळाा काशीवार यांनी केले.शिवनीबांध मत्स्य बिज निर्मिती केंद्र येथे आत्मा मत्स्य व्यवसाय व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेततळीसाठी मत्स्यबीज वाटप प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भंडारा जिल्हा मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी मा. मा. चांदेवार, सहायक आयुक्त मत्स्य व्यवसाय विभाग भंडारा, व्ही. के. पसारकर, आत्माच्या उपसंचालिका पी. एस. खटावकर, साकोली ता.कृ. अधिकारी जी. सी. चौधरी, लाखनी ता.कृ.अधिकारी पी. पी. गिदमारे, मंडळ कृषी अधिकारी डी. एस. गायकवाड, कृषी सहायक चंदन मेश्राम उपस्थित होते. यावेळी आमदार काशीवार म्हणाले, कोणत्याही क्षेत्रात आर्थिक प्रगतीसाठी शेतकऱ्यांनी शेतीसोबत पुरक व्यवसाय करणे काळाची गरज आहे. यात शेत तळ्याच्या योजनेच्या माध्यमातून मत्स्यशेती करुन शेतकऱ्यांनी आपला आर्थिक विकास करावा असे आवाहन करुन काशीवार म्हणाले की नविन पिढीला उच्च शिक्षणासोबतच व्यवसायात्मक प्रशिक्षण मिळणे गरजेचे आहे.याप्रसंगी आमदार काशीवार यांच्या हस्ते भंडारा जिल्ह्यातील ११० लाभार्थी शेतकऱ्यांना एक लक्ष दहा हजार मत्स्यबीजाचे वाटप करण्यात आले. यावेळी खटावकर यांनी आत्मा प्रकल्पाबाबत माहिती दिली व चांदेवार व पसारकर यांनी मत्स्यशेती सबंधी प्रात्याक्षीक करुन सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. संचालन चांदेवार यांनी तर आभार प्रदर्शन शिवनीबांध केंद्राचे सहायक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी हरिशचंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमात जिल्ह्यातील शेतकरी व मत्स्य शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)