शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना उपाययोजनांसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:01 IST

गत चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात आपल्या-आपल्यापरीने उपाययोजना करीत आहेत. शासनाच्यावतीने शासन निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने कोरोना उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देमागणी । सामान्य फंडावर पडतो भार

लोकमत न्यूज नेटवर्कखराशी : सध्या सर्वत्र कोरोनाचा कहर सुरु असून ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावात उपाययोजना राबविण्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने सामान्य फंडातून खर्च करण्याचा आदेश दिले आहेत. मात्र हा खर्च आवश्यक असला तरी ग्रामपंचातयीच्या सामान्य फंडावर भुर्दंड पडत आहे. त्यामुळे शासनाने ग्रामीण भागात उपाययोजना करण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी खराशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुधन्वा चेटुले यांनी शासन, प्रशासनाला पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.गत चार ते पाच महिन्यांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ग्रामीण भागात आपल्या-आपल्यापरीने उपाययोजना करीत आहेत. शासनाच्यावतीने शासन निर्णयाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने कोरोना उपाययोजना करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले आहेत. सामान्य फंडातून प्रतिबंधात्मक उपाययोजना औषध फवारणी, आरोग्यसेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर मानधन इत्यादी खर्च करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे शासन निर्णय लोकांच्या हिताचे असले तरी ग्रामपंचायतींना इतर कामात काटकसर करुन सामान्य फंडातील ही रक्कम खर्च करावी लागत आहे. याबाबत खराश्ीाचे उपसरपंच यांनी शासनाला मागणी करुन ग्रामपंचायतींना विशेष निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.सामान्य फंडावर भार न देता वेगळा निधी उपलब्ध झाल्यास ग्रामपंचायती गांभिर्याने विचार करुन गावात उपाययोजना राबवतील आणि कोरोनावर मात करण्यात यश मिळेल. याबाबद लहान ग्रामपंचायती चिंतेत असून दिवसेंदिवस शासननिर्णय धडकत आहेत. यासंबंधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याशी चर्चा करुन विशेष निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करणार असल्याचे सुधन्वा चेटुले यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgram panchayatग्राम पंचायत