शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

जनतेच्या समस्यांकडे प्राधान्याने लक्ष देऊन सोडवा

By admin | Updated: November 19, 2014 22:33 IST

जनता ही देव आहे. त्यांची सेवा करण्यासाठी सर्व विभाग काम करीत आहे. यापुढे जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष

जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक : नाना पटोले यांच्या अधिकाऱ्यांना सूचनाभंडारा : जनता ही देव आहे. त्यांची सेवा करण्यासाठी सर्व विभाग काम करीत आहे. यापुढे जनतेला त्रास होणार नाही याची दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीचे अध्यक्ष खा. नाना पटोले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत केंद्रीय योजनांचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आमदार बाळा काशीवार, जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल द्विवेदी उपस्थित होते.ग्रामीण पेयजल योजनांचा आढावा घेताना ते म्हणाले, ज्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण होवून अद्याप हस्तांतरीत झालेल्या नाही, त्या योजना सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आराखडा तयार करावा, अशा योजनांची तांत्रिक उपयोगिता, योजनेची सद्यस्थिती याची चौकशी करून अहवाल सादर करावा, असे सांगितले. यावेळी तुमसर पंचायत समितीचे सभापती कलाम शेख यांनी चांदमारा गावाजवळील टोलीमध्ये पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार केली. याबाबीची शहानिशा करून तात्काळ पाण्याची व्यवस्था करावी,, असे निर्देश खा. पटोले यांनी दिले.राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रमा अंतर्गत निराधार लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सहाय अनुदानाचा आढावा त्यांनी घेतला. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नायब तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. तसेच काही पदे दीर्घकाळ न भरल्यामुळे बंद झाली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी दिली. रिक्त पदे भरण्यासाठी २० नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यासमवेत होणाऱ्या बैठकीत हा विषय ठेवणार असल्याचे सांगितले. याशिवाय चुकीच्या कागदपत्राच्या आधारे निराधार, गरजूंच्या सुरु असलेल्या योजना बंद करू नका आणि आलेल्या अर्जावर पारदर्शकरीत्या निर्णय घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.इंदिरा आवास योजनेअंतर्गत ज्या दारिद्र्यरेषेखाली लाभार्थ्यांना घरकूल मिळाले नाही. त्यांची नवीन यादी तयार करावी, त्यामध्ये यादी तयार करताना लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून योग्य यादी तयार होईल याची दक्षता घ्यावी. गरीबांना घर उपलब्ध करून देताना संवेदनशीलपणे प्रश्न हाताळावे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. या बैठकीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य, उपजिल्हाधिकारी हरीष धार्मिक, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बंसोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) आडे, सुधीर वाळके, तहसीलदार हंसा मोहने, कल्याणकुमार डहाट, नरेंद्र राचेलवार, खंडविकास अधिकारी, जिल्ह्यातील प्रमुख उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)