शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

रेतीघाटावर तस्करांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 22:09 IST

तालुक्यात रेती चोरांवर पोलीस, महसूल व भंडारा पोलिसांनी निगराणी वाढविल्यानंतर आता रेती तस्करांनी आपला मोर्चा येथून जवळच असलेल्या तुमसर तालुक्यातील मात्र मोहाडी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या ढोरवाडा रेतीघाटाकडे वळविला असून गत पंधरा दिवसांपासून रोज पहाटे आठ ते दहा ट्रॅक्टर लावून नदीपात्रातून रेती नदीकाठावर काढून चारगाव, देव्हाडी रस्त्यालगत रेतीची डम्पींग केली जात आहे.

ठळक मुद्देढोरवाडा नदीपात्रातील प्रकार : पहाटे होतोय रेतीचा उपसा, महसूल विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : तालुक्यात रेती चोरांवर पोलीस, महसूल व भंडारा पोलिसांनी निगराणी वाढविल्यानंतर आता रेती तस्करांनी आपला मोर्चा येथून जवळच असलेल्या तुमसर तालुक्यातील मात्र मोहाडी पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या ढोरवाडा रेतीघाटाकडे वळविला असून गत पंधरा दिवसांपासून रोज पहाटे आठ ते दहा ट्रॅक्टर लावून नदीपात्रातून रेती नदीकाठावर काढून चारगाव, देव्हाडी रस्त्यालगत रेतीची डम्पींग केली जात आहे. नंतर ही रेती नजीकच्या गावातील गरजू लोकांना ट्रॅक्टरद्वारे पोहचविली जाते किंवा टिप्पर, ट्रक द्वारे नागपुरला रवाना केली जात आहे. प्रशासनातील अधिकारी मुद्दामहून या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याचे बोलले जात आहे.मोहाडी तालुक्यातील रोहणा, बेटाळा, रोहा, मोहगाव (देवी), पाचगाव, नेरी या घाटावरून रेती चोरी करण्यात येते. मात्र या घाटाकडे महसूल व पोलीस विभागाचे लक्ष असल्याचे रेती चोरांना या घाटातून रेती चोरी करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. यावर उपाय म्हणून आता रेती तस्करांनी आपला मोर्चा ढोरवाडा रेती घाटाकडे वळविला आहे. पहाटे पाच ते सहा वाजतापासून ते आठ नऊ वाजतापर्यंत नदीपात्रातून रेती काढून बाहेर डंपींग केली जाते. सायंकाळी जेसीबीच्या सहाय्याने विरोध नको म्हणून तेथील एका मंदिरात रेती तस्करांनी लाखो रुपयांचा दाम दिल्याची चर्चा आहे. ढोरवाडा हे गाव जुने गाव व नवीन गाव अशा दोन भागात विभागला गेला आहे. मंदिर नवीन गावात आहे व याच मंदिराला रेती तस्करांनी दान दिल्याचे बोलले जाते. तर वैनगंगा नदी जुन्या गावाला लागून आहे. त्यामुळे जुन्या गावातील नागरिकांनी अर्धा पैसा आम्हाला द्यावा, अशी मागणी केल्याने दोन गावात वाद निर्माण झाला असून रेती घाटावरून रेतीची चोरी अशीच सुरु राहिली तर, जुने गाव व नवीन वसाहत यांच्यात वादंग निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.ढोरवाडा रेतीघाटावरून चोरी केलेली रेती चारगाव - देव्हाडी रस्त्यालगत डंपींग करून ठेवण्यात येते. तसेच ट्रॅक्टरद्वारे सकाळच्या वेयी देव्हाडी, तुमसर, खापा, मोहाडी परिसरात घरबांधकामासाठी पोहचविली जात आहे. रेती चोरी होताना सर्व नागरिकांना दिसत आहे. परंतु तेथील तलाठी, पोलीस पाटील, सरपंच जे रेतीचोरी थांबविणाऱ्या समितीचे सदस्य आहेत. त्यांना हे सर्व दिसत नाही व ते मुख्यालयाला याची माहिती देत नाही.यातून काय समजावे असा प्रश्न काही सुज्ञ नागरिक उपस्थित करीत असून ढोरवाडा रेती घाटावरून होत असलेली रेतीची चोरी त्वरीत थांबविण्यात यावी अशी मागणी करीत आहेत. तालुक्यातील सर्वच रेतीघाटावरून कोट्यावधीची रेती चोरी झालेली असून आताही बेरोकटोक रेतीची चोरी सुरुच आहे. मात्र तालुका प्रशासनासह जिल्हा प्रशसन सुद्धा आंधळे असल्याचे सोंग करीत आहे.