जिल्ह्यातील सहा तालुके कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST2021-09-27T04:38:27+5:302021-09-27T04:38:27+5:30

भंडारा : जिल्ह्यात कोरोनाच्या एका रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर सहा तालुके कोरोनामुक्त झाली आहेत. केवळ लाखनी तालुक्यात एक क्रियाशील ...

Six talukas of the district are corona free | जिल्ह्यातील सहा तालुके कोरोनामुक्त

जिल्ह्यातील सहा तालुके कोरोनामुक्त

भंडारा : जिल्ह्यात कोरोनाच्या एका रुग्णाला डिस्चार्ज दिल्यानंतर सहा तालुके कोरोनामुक्त झाली आहेत. केवळ लाखनी तालुक्यात एक क्रियाशील रुग्ण उरला आहे. रविवारी ४३२ चाचण्या झाल्या असून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. भंडारा, मोहाडी, तुमसर, पवनी, साकोली व लाखांदूर तालुक्यात आता कोरोनाचा एकही रुग्ण नाही. जिल्हात आता एक सक्रिय रुग्ण आहेत.

बरे झालेल्या रुग्णांची संख्या ५८ हजार ९५९ झाली आहे. आज एकही व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आला नाही. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६० हजार ९३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. आतापर्यंत ४ लाख ६० हजार ३३० व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यात जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या ११३३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ०१.८८ टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ ०.०१ टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खासगी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राइब करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

Web Title: Six talukas of the district are corona free