शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

साकोलीत दरोड्याच्या प्रयत्नात असलेले सहा दरोडेखोर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 05:00 IST

साकोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान मंगळवारी पहाटे वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटारसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून लोखंडी राॅड, चाकू, मिरची पावडर व दोरी जप्त करण्यात आली.  साकोली तालुक्यातील आमगाव येथील डाॅ. वसंतराव बाळबुद्धे यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी जाण्यासाठी जात असल्याचे आरोपींनी सांगितले.

लाेकमत न्यूज नेटवर्कसाकोली : दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या सहा दरोडेखोरांना मोठ्या शिताफीने भंडारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी पहाटे तालुक्यातील वलमाझरी फाट्यावर जेरबंद केले. गत दोन ते अडीच महिन्यांपासून दरोड्यासाठी रेकी करत असल्याचे पुढे आले. दरोडेखोरात साकोली तालुक्यातील एका डॉक्टर पुत्राचा समावेश असून तोच मास्टरमाइंड असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा मोठा डाव उधळून लावण्यात आला.सूरज राम अवतार जयस्वाल (२८) रा. संजयनगर गोविंदपूर, मिलिंद नरेंद्र गजभिये (३७) रा. कस्तुरबा वार्ड गोंदिया हल्ली मुक्काम कामठी जि. नागपूर, रामेश्वर ज्ञानीराम वाढई (३२) रा. इंदिरा गांधी वार्ड कुंभारटोली भंडारा, अरविंद वामन डोंगरवार (४२) रा. घानोड, ता. साकोली, कोमल रमेश बनकर (२६) रा. छोटा गोंदिया अशी अटकेतील दरोडेखोरांची नावे आहेत. अरविंद डोंगरवार हा साकोली तालुक्यातील एका प्रतिष्ठित डॉक्टर पुत्र असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. साकोलीपासून १५ किलोमीटर अंतरावरील एका गावात डॉक्टरच्या घरात मोठा दरोडा पडणार, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. तेव्हापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान मंगळवारी पहाटे वलमाझरी फाट्यावर सहा व्यक्ती मोटारसायकलवर येताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या जवळून लोखंडी राॅड, चाकू, मिरची पावडर व दोरी जप्त करण्यात आली.  साकोली तालुक्यातील आमगाव येथील डाॅ. वसंतराव बाळबुद्धे यांच्या घरी दरोडा टाकण्यासाठी जाण्यासाठी जात असल्याचे आरोपींनी सांगितले. विशेष म्हणजे डाॅक्टर परिवारासह बाहेरगावी असून त्यांची आई एकटी घरी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख जयवंत चव्हाण, ठाणेदार जितेंद्र बाेरकर यांनी केली. आरोपींना साकोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

पोलिसांचा अलर्ट आणि रात्रभर जागरण- सोमवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला नागपूरवरून एक निनावी फोन आला. त्याने रात्री साकोली तालुक्यात दरोडा पडण्याची शक्यता आहे, असे म्हणून आपला फोन बंद केला. त्यानुसार साकोली तालुक्यातील अलर्ट जारी केला. साकोली शहरावर विशेष नजर ठेवली होती. पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नागरिकांनाही आवाहन करून घराबाहेरील लाईट सुरू ठेवा, जगत रहा असे म्हणत पोलिसांनी रात्रभर सायरनचा वाजवत गस्त घालत हाेते. त्यामुळे साकोलीच्या नागरिकांनी रात्र जागून काढली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी