शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, आमच्या पंपाची वीज कापू नका जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:24 IST

तुमसर तालुक्यात खरीप हंगामातील धान पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी लगबग करीत आहेत. कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे वीजबिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांच्या ...

तुमसर तालुक्यात खरीप हंगामातील धान पिकाच्या लागवडीसाठी शेतकरी लगबग करीत आहेत. कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे वीजबिल थकीत आहे. अशा शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडित करणे वीज वितरण कंपनीने सुरू केले आहे. ऐन हंगामात वीज वितरण कंपनीने वीज खंडित करण्याचा सपाटा सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांनी धानाची पेरणी सुरू केली आहे. त्यामुळे शेतीला सध्या पाण्याची गरज आहे. अशावेळी पंपाची वीज खंडित झाल्यामुळे पेरणीला पाणी कुठून द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट

खरीप हंगामाची सुरुवात झाली असून, शेतकऱ्यांना धान लागवडीकरिता पैशाची गरज आहे. कृषी पंपाचे वीज बिल भरले तर त्यांच्याकडे पैसे शिल्लक राहणार नाही. त्यामुळे अनेकांची शेती ही पडीक राहण्याची भीती आहे. शासनाने वीज वितरण कंपनीला कृषी पंपाची वीज खंडित करू नये, असे आदेश द्यावेत; अन्यथा शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरून विरोध करण्यात येईल.

शंकर राऊत, अध्यक्ष, तुमसर तालुका काँग्रेस कमिटी.

कोट

ज्या शेतकऱ्याकडे कृषी पंपाचे वीज बिल थकीत आहे, त्या शेतकऱ्यांची वीज खंडित करण्याच्या स्पष्ट सूचना शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार थकीत शेतकऱ्यांच्या कृषी पंपाची वीज खंडित केली जात आहे.

रूपेश अवचट, उपकार्यकारी अभियंता, वीज वितरण कंपनी, तुमसर.