शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम उद्योग कार्यशाळा

By admin | Updated: March 3, 2016 00:48 IST

जिल्ह्यात वनव्यवस्थापन समितीमार्फत टसर रेशीम विकास योजना तयार करुन टसर लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल.

भंडारा : जिल्ह्यात वनव्यवस्थापन समितीमार्फत टसर रेशीम विकास योजना तयार करुन टसर लाभार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येईल. त्यासाठी वनविभागमार्फत लाभार्थी निवड करण्यात येईल, असे आवाहन उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीन यांनी केले.उपवनसंरक्षक एन. आर. प्रवीन यांचे अध्यक्षतेखाली मुलभूत सुविधा केंद्र जमनी येथे टसर रेशीम उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रादेशिक रेशीम उद्योग कार्यालयाचे सहाय्यक संचालक जी.एन. राठोड, आत्माच्या प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, रेशीम विकास अधिकारी एस.के. शर्मा उपस्थित होते. सहाय्यक संचालक राठोड यांनी महाराष्ट्रातील टसर रेशीम विकासाबाबत माहिती दिली. के. बी. चव्हाण यांनी टसर किटक संगोपन व अंडीपूज निर्मिती तर ज्येष्ठ तांत्रिक सहाय्यक रायसिंग यांनी टसर कोषाचे धागा निर्मिती वन व्यवस्थापन समितीद्वारे करुन जिल्ह्यातील उत्पादित कोषावर जिल्ह्यात प्रक्रिया करणे व धागा निर्मिती करुन कापड निर्मिती करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. शर्मा यांनी टसर रेशीम उद्योगाचे तांत्रिक मार्गदर्शन स्लाईड शोद्वारे करतांना जिल्ह्यात आठ बचत गटामार्फत टसर कोष उत्पादन देण्यात आले असून आत्माच्या योजनेतून त्यांना आर्थिक सहाय उपलब्ध होत असल्याचे सांगितले. प्रज्ञा गोडघाटे यांनी टसर रेशीम उद्योगाकरीता लाभार्थ्यांना बीज भांडवल उपलब्ध करुन दिले जाईल तसेच टसर रेशीम व्यतिरिक्त व्यवसायाकरीता आत्मा योजनेतून लाभार्थ्यांना प्रशिक्षण, अभ्यासदौरे व साहित्य उपलब्ध करुन देण्यात येईल, असे सांगितले. कार्यशाळेला भंडारा, पवनी, अडयाळ, लाखांदूर, लाखनी, साकोली वनक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, क्षेत्रसहाय्यक, वनरक्षक उपस्थित होते.(जिल्हा प्रतिनिधी)