शिवरायांचे लोककल्याणकारी कार्य प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:51+5:302021-06-09T04:43:51+5:30

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ या मंगलमय दिनी झाला आणि राजे ‘छत्रपती’ झाले. आजच्याच शुभ दिनी ...

Shivaraya's public welfare work is inspiring | शिवरायांचे लोककल्याणकारी कार्य प्रेरणादायी

शिवरायांचे लोककल्याणकारी कार्य प्रेरणादायी

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ६ जून १६७४ या मंगलमय दिनी झाला आणि राजे ‘छत्रपती’ झाले. आजच्याच शुभ दिनी शिवाजी महाराजांनी आपल्या सार्वभौमत्वचा मंगल कलश जनतेला अर्पण करून समृद्धीचे दिवस आणले. आजपासून दरवर्षी ६ जून हा दिवस ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून साजरा करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा परिषद प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन शिवस्वराज्य दिन साजरा केला. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मुन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन पानझाडे व जिल्हा परिषदेचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

पहिलाच शिवस्वराज्य दिन जिल्हाभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भंडारा जिल्ह्यात सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यालयात शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रगीत महाराष्ट्राचे मंगलगाण गाऊन हा दिवस सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला.

Web Title: Shivaraya's public welfare work is inspiring